अर्जुनी मोर.– नैसर्गिक आपत्ती मुळे विज पडुन म्हैस मृत्यु झाली होती.तहसिलदार अनिरुध्द कांबळे यांनी त्वरीत प्रस्ताव तयार करुन म्हैस मालकाला 48 तासाच्या आत आर्थीक सानुग्रह मदतीचा धनादेश ता.21 जुन रोजी देण्यात आला.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार अर्जुनी मोर तालुक्यातील कोरंभी येथे माणीक गोपाल नाकाडे यांची एक दुधाळ म्हैस 19 जुन रोजी सायंकाळी 4:30 वाजेच्या दरम्यान मरण पावली. या साझ्याचे तलाठी यांनी पंचनामा करुन तहशिल कार्यालयास सादर केला.तहसिलदार अनिरुध्द कांबळे यांनी त्वरीत प्रस्ताव तयार करुन म्हैस मालकाला आर्थीक सानुग्रह मदत 37 हजार 500 रुपये 48 तासांचे आत मंजुर करुन दिले.व आज ता.21 जुन रोजी तहसिल कार्यालयात माजी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री ईंजी राजकुमार बडोले यांचे हस्ते धनादेश म्हैस मालकाला प्रदान करण्यात आला. यावेळी तहसिलदार अनिरुध्द कांबळे, भाजपा तालुका अध्यक्ष विजय कापगते, महामंत्री लैलेश शिवनकर, दिपंकर उके, नंदकिशोर गहाणे, नरेश खंडाईत,व अन्य कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते.