सुंदर माझा दवाखाना सप्ताह उत्साहात साजरा करा-जिल्हा शल्यचिकित्सक डॉ कावरखे

0
50
जिल्हा रुग्णालयात विविध कार्यक्रमाचे आयोजन
वाशिम,दि.२3 जून-जिल्हा रुग्णालयात २७ जूनपर्यंत सुंदर माझा दवाखाना सप्ताह साजरा करण्यात येत आहे. त्याअनुषंगाने जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अनिल कावरखे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा सामान्य रुग्णालय येथे २२ जून रोजी रांगोळी स्पर्धा व पोस्टर स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. सर्वप्रथम अतिरीक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अविनाश पुरी यांनी स्पर्धकांना स्वच्छतेबद्दल मार्गदर्शन केले. त्यांनी पावसाळयात साथीचे आजारावर प्रतिबंधनासाठी वैयक्तिक स्वच्छता व सार्वजनिक स्वच्छता हा अंत्यत महत्वाचा विषय आहे. त्याअनुषंगाने जणजागृती करणे व स्वच्छतेचा कृतीतून स्वच्छतेचा संदेश देणे याचे महत्व पटवून दिले. या सप्ताहानिमित्त मुख्यत्वेकरुन तंबाखू, पान, गुटका खाणे आणि थुंकणे याबाबत जनजागृती करण्यात येत असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. श्री . कावरखे यांनी जिल्हा रुग्णालयातील परिसर, रुग्ण कक्ष, स्वच्छता गृहे तसेच इतर सर्व रुग्णालयाची साफसफाई प्राधान्याने करण्यात यावी अशा सुचना दिल्या. यावेळी संबंधितांना दिल्या. महिन्यातला पहिला शनिवार
हा स्वच्छता दिन म्हणून सर्व आरोग्य संस्थामध्ये पाळला जातो. आज सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी रुग्णालयीन परिसर, वार्डची स्वच्छता केली. सुंदर माझा दवाखाना सप्ताहाअंतर्गत बाह्य संपर्क अधिकारी डॉ. पराग राठोड यांच्या निरीक्षणाखाली रांगोली स्पर्धा व पोस्टर स्पर्धा घेण्यात आली. स्पर्धत शासकीय परिचर्या प्रशिक्षण केंद्र वाशिमच्या विदयार्थ्यांनी सहभाग नोंदविला.रांगोळी स्पर्धेत प्रथम क्रमांक प्रांजली जाधव, द्वितीय
क्रमांक पल्लवी कांबळे, तृतीय क्रमांक ऋषिकेश जारे तसेच प्रोत्साहनपर आरती सुरुशे यांनी पटकविला. पोस्टर स्पर्धेत प्रथम क्रमांक वैष्णवी शिंदे, द्वितीय क्रमांक स्वाती राठोड, तृतीय क्रमांक अनुराधा पाटील यांनी पटकाविला. स्पर्धेचे परीक्षक म्हणुन श्रीमती हजारे , श्रीमती गजबे,श्रीमती मानतोडे यांनी काम पाहिले. या स्पर्धेकरीता आरोग्य निरीक्षक नितीन व्यवहारे, श्रीमती भालेराव, रेणुकादास मैड,श्रीमती शिंदे यांनी परीश्रम घेतले.