एका बालकाचे प्राण वाचले
यवतमाळ दि:26-उमरखेङ तालुक्यातील ढाणकी जवळ सावळेश्वर,येथील पैनगंगा नदीला तब्ब्ल तीन महिन्याने पाणी आल्याने गावातील महिला मंडळी आज 26 जून रोजी सकाळी 11 वाजता कपडे धुनी करण्यास गेल्या होत्या.त्यांच्या बरोबर अवन्तिका व कावेरी हि कपडे धुण्यास गेल्या होत्या.कपडे धुणे झाल्यानंतर आंघोळ करण्यास नदी पात्रात गेलेल्या असताना अचानक तोल जाऊन त्या पाण्यात पडल्या.पाण्यात बुडत असल्याचे नदीवर कापड धुण्यास आलेल्या इतर महिलांच्या लक्षात येताच त्यांनी आरडा ओरडा केलामुळे त्यांना वाचवण्यासाठी जवळच असलेल्या दोन मुलांनी पाण्यात उडी घेतली.मात्र दोन मुलींना त्यांना वाचवण्यात यश आले नाही,दोघांपैकी एक मुलगा पाण्यात बुडाला.
सविस्तर वृत्त असे की, सावळेश्वर येथे मामाच्या घरी आलेल्या कावेरी गौतम मुनेश्वर वय पंधरा वर्ष ही मुलगी आपली मैत्रीण अवंतिका राहुल पाटील वय 14 तिच्यासोबत धुणे धुण्यासाठी नदीवर गेल्या होत्या. धुणे धुतल्या नंतर दोघी आंघोळी करता नदीपात्रात उतरल्या असता पाण्याचा अंदाज न आल्याने त्या बुडू लागल्या. त्यांचा आरडाओरडा ऐकून बाजूलाच नदीकाठी असलेले चेतन देवानंद काळबांडे राहणार सावळेश्वर वय 16, व शुभम सिद्धार्थ काळबांडे वय 22 हे दोघे मदतीसाठी धावले. मात्र घाबरलेल्या कावेरी आणि अवंतिकाने वाचवण्यासाठी आलेल्या चेतन याला घट्ट पकडल्याने चेतन सुद्धा पाण्यात बुडू लागला तर शुभम यामधून वाचला. घटनेची माहिती गावामध्ये कळताच गावकऱ्यांनी नदीपात्राकडे धाव घेतली. यात गावकऱ्यांनी शुभम याला वाचवले मात्र त्या तिघांना वाचवण्यात गावकऱ्यांना यश आले नाही. चौघांना नदीतून बाहेर काढल्या नंतर प्राथमिक आरोग्य केंद्र ढाणकी येथे आणले असता डॉक्टरांनी कावेरी, अवंतिका आणि चेतन यास मृत घोषित केले. शुभम याला पुढील उपचारा करीता जिल्हा रुग्णालयात रेफर करण्यात आले तिन्ही मृतकाचे शवविच्छेदन डॉ स्वाती मुनेश्वर यांनी केल घटनेमुळे सावळेश्वर गावामध्ये शोक काळा पसरली आहे.