साडेबारा कोटीच्या निधीतुन होणार रस्त्यांची दर्जोन्नती- माजी मंत्री राजकुमार बडोले

0
68

अर्जुनी मोर.– राज्याचे माजी सामाजिक न्याय मंत्री तथा अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार ईंजी.राजकुमार बडोले यांचे विशेष प्रयत्नाने अर्जुनी मोर. विधानसभा क्षेत्रातील 30 गावांत रस्त्यांची दर्जोन्नती होणार असुन यासाठी 12 कोटी 60 लाखाचा निधी माजी मंत्री राजकुमार बडोले यांचे प्रयत्नाने मंजुर झाले असल्याची माहीती त्यांचे कार्यालयातून प्राप्त झाली आहे.
आदिवासी उपाय योजनेअंतर्गत ही कामे माजी मंत्री बडोले यांनी मंजुर करुन आणली असल्याचे त्यांचे कार्यालय सुत्रांनी सांगीतले.यामधे सडक/ अर्जुनी तालुक्यात 5 कोटी 20 लक्ष तर अर्जुनी मोरगाव तालुक्यात 7 कोटी 40 लाखाचा निधी मंजुर करण्यात आला आहे. दोन्ही तालुके मिळुन एकुन 12 कोटी 60 लाखाच्या निधीतुन दोन्ही तालुक्यांतील 30 आदिवासी गावांना जोडणा-या रस्त्यांचे डांबरीकरण होणार आहे. अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रातील गावांसाठी विवीध योजनेतुन निधी आणुन विकास करणार असल्याचे माजी मंत्री राजकुमार बडोले यांनी सांगीतले.