बाघनदीच्या पूरात ट्रॅक्टर गेले वाहून

0
75

गोंदिया,दि.२३- देवरी तालुक्यातील शिलापूर- पुराडा मार्गावरील बाघनदीच्या पुरात ट्रॅक्टर वाहून गेल्याची घटना २२ जुर्ले रोजी घडली.ट्रॅक्टर चालक कृष्णा मारोती वल्थरे (३०) रा पद्मपुर याने पुलावरुन पाणी वाहत असतानाही ट्रॅक्टर नेण्याचा प्रयत्न केला,यात ट्रॅक्टर बाघनदीत वाहून गेले मात्र चालकाने आपला जीव वाचविला.

शेतीच्या कामासाठी सदर ट्रैक्टर रोजंदारीच्या महिलांना सोडायला गेले होते. पुलावरुन पुराचे पाणी जात असतांना सुद्धा चालकाने अती आत्मविश्वासाने पुराच्या पाण्यात ट्रॅक्टर नेले. शिरपूरच्या मनोहर सागर धरणाचे वक्र दरवाजे उघडण्यात आल्यामुळे पाण्याच्या पातळीत वाढ झाली असून यामध्ये ट्रॅक्टर वाहून गेले.