अंगणवाडीतुन बालकांना उत्तम दर्जाचे संस्कार व शिक्षण मिळावे:-जि.प.सदस्या रचनाताई गहाणे

0
107

अर्जुनी मोर. – अंगणवाडी केंद्राची ईमारत सुसज्ज व सोयीयुक्त असावी या अंगणवाडी केंद्रातुन गरोदर माता , लहान बालकांना उपवर मुली यांची निगा राखुन वेळोवेळी पोषक आहार दिला जातो.तर बालकांना अक्षर ओळख सोबत विविध कला व खेळ शिकविल्या जाते.त्यामुळे अंगणवाडी केंद्राला विशेष महत्व आहे.अंगणवाडीतुन बालकांना उत्तम दर्जाचे संस्कार व शिक्षण मिळावे असे प्रतिपादन गोंदिया जिल्हा परिषद सदस्य रचनाताई गहाणे यांनी केले.
तालुक्यातील बिडटोला येथे नवीन अंगणवाडी ईमारतीच्या लोकार्पण प्रसंगी ता.23 रचनाताई गहाणे उदघाटक म्हणुन बोलत होत्या.अध्यक्षस्थानी पंचायत समितीचे उपसभापती होमराज पुस्तोळे होते. यावेळी पं.स.सदस्य पुष्पलता दृगकर, सरपंच भुमिका ढोक, पोलीस पाटील नितीन मेश्राम, तमुअ भाऊराव गायकवाड, अंगणवाडी सेविका,मदतनिस, सर्व ग्रामपंचायत सदस्य व गावातील प्रतिष्ठीत नागरीक प्रामुख्याने उपस्थित होते. बिडटोला येथे गेल्या अनेक दिवसांपासून अंगणवाडी ईमारतीची मागणी होती.जि.प.सदस्या रचनाताई गहाणे यांचे विशेष प्रयत्नातुन ही ईमारत मंजुर करण्यात आली.व त्या ईमारतीचे लोकार्पण करण्यात आले.त्यामुळे ग्रामवासियांनी रचनाताई गहाणे यांचे आभार मानले.