माजी मंत्री राजकुमार बडोलेनी केली पूरग्रस्त भागाची पाहणी

0
103

अर्जुनी मोर. – तालुक्यात मागील सप्ताहापासून मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली. अनेक गावे पाण्याखाली आली तर अनेक गावांचा तालुक्याशी संपर्क तुटला होता. तालुक्याची ही भीषण स्थिती लक्षात घेता माजी सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांनी 23 जुलै रोजी अर्जुनी मोरगाव तालुक्याचा दौरा केला. पूर परिस्थितीची पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांना परिस्थितीची जाणीव करून देऊन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे व पडझड झालेल्या घरांचे पंचनामे करून त्वरित मदत देण्याचे आवाहन केले.
अर्जुनी मोरगाव तालुक्यात सर्वाधिक पावसाची नोंद करण्यात आली आहे. तालुक्यातील नवेगाव बांध व इटियाडोह धरण ओवरफ्लो झाली आहेत. तर तालुक्यात असलेले सर्व तलाव बोड्या तुडुंब भरले आहेत. नदी नाले ओसंडून वाहत आहेत. नाल्यावरील पुलावरून पाणीही वाहत आहे. तालुक्यात पिंपळगाव येथे मुरमाच्या खाणीत साचलेल्या पाण्यामध्ये दहा वर्षीय मुलाचा मृत्यू झाला तर गौरनगर येथे बारा वर्षाचा मुलगा नाल्याच्या पाण्यात वाहून गेला. अनेक नदी नाल्याच्या काठावर असलेल्या शेतातील पिके पुरा खाली आल्याने धान पिकाचे नुकसान झाले आहे तर तालुक्यात मोठ्या प्रमाणात घरांची पडझड सुद्धा झाली आहे. अनेक गावात वीज पुरवठा ही खंडित झाला आहे. जीवित हानी सोबत वित्तहानी मोठ्या प्रमाणात झाल्याचे समजते, ही परिस्थिती लक्षात घेता अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार व माजी मंत्री राजकुमार बडोले यांनी अर्जुनी मोरगाव तालुक्यातील पूरग्रस्त भागाचा दौरा केला. गौरनगर येथे मृत्युमुखी पडलेल्या बालकांच्या परिवाराला भेट देऊन त्यांचे सांत्वन केले.पुरामुळे नुकसान झालेल्या शेतीची पाहणी केली. तसेच परिसरातील गावात पडझड झालेल्या घरांची पाहणी केली. यावेळी त्यांनी नुकसानग्रस्त आपतग्रस्त लोकांची व व शेतकऱ्यांशी चर्चा सुद्धा केली. तसेच भ्रमणध्वनी द्वारे उपविभागीय अधिकारी, तहसीलदार आपत्ती व्यवस्थापनाचे अधिकारी यांचे सी चर्चा करून परिस्थितीची जाणीव करून दिली. व शक्य तेवढ्या लवकर पूर परिस्थितीवर लक्ष ठेवून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतीचे पंचनामे करून मदत देण्याची मागणी केली. यावेळी माजी मंत्री राजकुमार बडोले सोबत अर्जुनी मोरगाव तालुका भाजपा अध्यक्ष विजय कापगते, तालुका महामंत्री लैलेश शिवणकर, मिथुन टेंभुर्णे, राजहंस ढोक व अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.