गोठणगाव, जुनेवानी परिसरात हत्तीचा मुक्काम

0
30

अर्जुनी मोरगाव  : तालुक्यातील नागणडोह परिसरासह इतर ठिकाणी मागील वर्षी हत्तींच्या कळपाने धुमाकूळ घालून धानपिकांसह घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले होते. यातील अनेकांना अद्यापही नुकसान भरपाई मिळालेली नाही. त्यातच पुन्हा नवेगावबांध परिसरातील टोली वसाहतीत  हत्तींच्या आगमनाची चाहुल त्यांच्या पायखुणावरून २५ जुलै रोजी उघडकीस आले होते. त्यातच तालुक्यातील गोठणगाव व जुनेवानी परिसरात हत्ती आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. परिणामी शेतकर्‍यांमध्ये चिंता दिसून येत आहे.नवेगावबांध परिसरातील डेपो, ओव्हर फ्लो कडील टोलीवसाहतीत हत्तींच्या पाऊलखुणा दिसून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मागील वर्षी  हत्तींच्या कळपाने नागणडोहसह परिसरात घातलेला धुमाकूळ चांगलाच चर्चेत आला होता. यात अनेक शेतकरी कुटूंबाचे नुकसान झाले. मात्र अद्यापही त्या कुटूंबाना मदत मिळालेली नाही. अशात पुन्हा हत्तीच्या पाऊल खुणा दिसून आल्याने चिंता निर्माण झाली आहे. गेल्या तीन दिवसांपासून येथे व परिसरातील शेतकर्‍यांमध्ये खळबळ उडवून देणारा हत्ती नवेगावबांध परिसरात परिसरात व २७ जुलै रोजी दिसून आलेला गजराज गोठणगाव वनपरिक्षेत्रात  असल्याची माहिती वन विभागाने दिली आहे. त्यातच खोकरी ते चिचोली दरम्यान हत्तीच्या पाऊल खुणा एका शेतात दिसून आल्या आहेत. त्यामुळे हत्ती हा गोठणगाव परिसरात वास्तव्याला असल्याची पुष्टी वन विभागाने केली आहे. परिसरात वास्तव्य करून आज दुपारच्या गस्ती दरम्यान हत्ती गोठणगाव वनपरिक्षेत्रातील केळवद येथील योगराज शहारे व कांतीलाल नंदेश्वर यांच्या शेतातून गवर्रा पांदन रस्त्याने परसटोला व तेथुन जुनेवाणी बिटाकडे गेला असल्याची माहिती आहे.