पट्टेधारकाच्या ७/१२ उतारावर मालकी हक्काची नोंद करा-जि.प.सदस्य एड.रहागंडाले

0
853

तिरोडा,दि.३०- तिरोडा तालुक्यातील ठाणेगाव जिल्हा परिषद क्षेत्रात गेल्या १० दिवसापासून सुरु असलेल्या सततधार पावसामुळे शेती पाण्याखीली गेल्याने शेतकरी अडचणीत सापडलेला आहे.त्या पाण्याखाली गेलेल्या शेतीचे पंचनाने त्वरीत करुन शेतकर्याना तत्काळ मदत देण्यात यावे.सोबतच पट्टेधारक शेतकर्याच्या ७/१२ उतारावर मालकी हक्काची नोंद करून ई पीक व शासकीय योजनेचा लाभ देण्याकरीता शासन स्तरावर मागणी करण्याची मागणी जिल्हा परिषद सदस्य ऍड माधुरी रहांगडाले यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली.वनहक्क समितीच्या बैठकीत आज त्यांनी यांसदर्भातील मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी यांना सादर केले.यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी एम.मुरुगांनाथम व इतर अधिकारी उपस्थित होते.