“स्टॉपें डायरिया” अभियान निमीत्ताने प्रभातफेरी जनजागृती रॅली
गोंदिया,दि.०१-पावसाळ्यात दूषित पाण्यामुळे जलजन्य आजार होतात.ग्रामपंचायतीमध्ये शुद्ध पाणी निर्जंतूक करून पिल्यामुळे जलजन्य आजार होणार नाहीत.जलजन्य आजार रोखण्याबाबत लोकांमध्ये जनजागृती निर्माण करण्यासाठी जिल्ह्यात १ जुलै ते ३१ ऑगस्ट या दरम्यान “स्टॉपें डायरिया” अभियान राबविण्यात येत असल्याची माहीती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नितीन वानखेडे यांनी या वेळी दिली आहे.
दूषित पाण्यामुळे डायरिया होण्याचे प्रमाण जास्त आहे.त्यामुळे अतिसार होऊन धोका संभवतो.त्यामुळे काळजी घेणे आवश्यक आहे.विहिरी, बोअरचे पाणी उकळून, गाळून पिणे आवश्यक असल्याचे सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अरविंदकुमार वाघमारे यांनी म्हटले आहे.
जिल्हा आरोग्य प्रशासन, के.टी.एस.सामान्य रुग्णालय व राष्ट्रीय आरोग्य अभियान यांच्या एकत्रित सहकार्याने “स्टॉप डायरिया” अभियानाच्या अनुशंगाने दि.30 जुलै प्रभातफेरी माध्यमातुन जनजागृती करण्यात आली. जनजागृती प्रभातफेरी केटीएस सामान्य सामान्य रुग्णालय येथुन रॅलीचे आयोजन करण्यात आले. रॅलीला जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.नितीन वानखेडे, जिल्हा शल्यचिकित्सक, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.तृप्ती कटरे ,सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अरविंदकुमार वाघमारे यांनी हिरवी झेंडी दाखवुन रॅलीचे उदघाटन केले.प्रभातफेरी केटीएस सामान्य रुग्णालय येथून ईंदिरा गांधी स्टेडियम मैदान-बाजार चौक-जयस्तंभ चौक भागात प्रभातफेरी काढण्यात आली. विविध संदेश देत जनजागृती करण्यात आली. प्रभात फेरी द्वारे समाजामध्ये जनजागृती निर्माण होण्यासाठी विविध प्रकारचे माहिती फलक विध्यार्थ्यानी घेऊन फेरीत सहभाग घेतला.
प्रभातफेरीत बाई गंगाबाई स्त्री रुग्णालयातील नर्सिंग कॉलेजने विद्यार्थी यांनी जनजागृती केली.प्रभातफेरी दरम्यान निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.भारती ज़ायस्वाल, वैद्यकीय अधिकारी डॉ.अजय घोडमारे,वैद्यकीय अधिकारी डॉ.पोषणलाल बिसेन,डॉ.मिना वट्टी,डॉ.स्वर्णा उपाध्याय, राष्ट्रीय बाल स्वस्थ कार्यक्रमाचे जिल्हा समन्वयक संजय बिसेन, जिल्हा विस्तार व माध्यम अधिकारी विजय आखाडे,जिल्हा आय.ई.सी अधिकारी प्रशांत खरात,वैद्यकीय अधिकारी डॉ.विकास विंचुरकर,प्रयोगशाळा तंत्रज्ञ मंगला तुरकर,उज्वला सेलोकर,नेहा टेंभरे,डॉ.स्नेहा वंजारी,डॉ.कांचन भोयर,सपना खंडाईत,अर्चना शिवणकर,रेखा कानतोडे,संध्या शंभरकर,तार्केश उके,बर्बा बोहरे यांचे समवेत के.टी.एस. सामान्य रुग्णालयाचे इतर अधिकारी/कर्मचारी वर्ग उपस्थित होते.शेवटी कार्यक्रमात सुत्रसंचालन संजय बिसेन व आभार प्रदर्शन सपना खंडाईत यांनी केले.