लाडकी बहीण योजना निरंतर सुरू राहिल: माजी मंत्री राजकुमार बडोले 

0
342
अर्जुनी मोरगाव विधानसभाक्षेत्राचा लाडकी बहीण मेळावा संपन्न
सडक अर्जुनी,दि.१९: भारतीय जनता पक्षातर्फे शेंडा जिल्हा परिषद क्षेत्रात “माझी लाडकी बहीण” या भव्य मेळाव्याचे आयोजन ग्राम बामणी/ख. येथे दि. १८ सप्टेंबर रोजी करण्यात आले होते. यावेळी उपस्थित लाडक्या बहिणीना विविध योजनांची माहिती देण्यात आली. देशात आणि महाराष्ट्र राज्यात महिलांना सशक्त करण्यासाठी विविध योजना सुरू करण्यात आल्या. या योजनामुळे महिलांचा आर्थिक विकास होऊन त्या आपल्या आर्थिकदृष्ट्या सक्षम झाल्या पाहिजे हा उद्देश असून त्यामुळे आज अनेक महिला सक्षम झाल्या आहेत. अनेक महिला बचत गटांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर आपले गाव नेऊन ठेवले आहे ही फार आनंदाची बाब आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू करण्यामागे महिलांच्या छोट्या छोट्या गरजा पूर्ण करणे आहे. आता सरकार १५०० रुपये प्रति महिना लाडक्या बहिणीना देत असून ही योजना निरंतर सुरु राहणार आहे. तसेच आगामी काळात ही रक्कम वाढवण्यात देखील येणार आहे. अशी माहिती माजी मंत्री राजकुमार बडोले यांनी दिली.सोबतच सुकन्या समृद्धी योजना, माझी कन्या भाग्यश्री योजना तसेच राज्यात मुलींचे उच्च शिक्षण मोफत करण्यात आले असल्याची माहिती सुद्धा दिली.
राज्यात महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याकरिता लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली. मात्र या योजनेमुळे राज्यातील महाविकास आघाडीच्या नेत्याना पोटशूळ उठले असून ते लोक ही योजना बंद करण्याच्या प्रयत्नात आहेत. मात्र आपण सर्वांनी काँग्रेस चा हा प्रयत्न हाणून पाडण्याची गरज असल्याचे मत माजी मंत्री राजकुमार बडोले यांनी व्यक्त केले आहे.
दरम्यान जिल्हा महामंत्री सिताताई रहांगडाले, तालुका अध्यक्ष लक्ष्मीकांतजी धानगाये, चामेश्वरजी गहाने, जि.प. सदस्य डॉ. लक्ष्मणजी भगत, लायकरामजी भेंडारकर, डॉ. भुमेश्वरजी पटले, कविताताई रंगारी, निशाताई तोडासे, संगीताताई खोब्रागडे, शालींदरजी कापगते, चेतनजी वडगाये, विलासजी वट्टी, सपनाताई नाईक, दिपालीताई मेश्राम, वर्षाताई शहारे तसेच अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते व शेंडा जिल्हा परिषद क्षेत्रातील महिला बहिणी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.