
अर्जुनी मोरगाव दि.०५: गोठणगाव जिल्हा परिषद क्षेत्रातील विविध विकासकामांचे भूमिपूजन जिल्हा परिषद उपाध्यक्ष तथा सभापती शिक्षण क्रीडा व आरोग्य इंजि यशवंत गणविर यांच्या हस्ते संपन्न झाले.
गोठणगाव जिल्हा परिषद क्षेत्र हा अतिदुर्गम आदिवासी बहुल, अतिसंवेदनशील नक्षलग्रस्त डोंगराळ भागात वसलेला असून विकासापासून कोसो दूर होता.परंतु आज हा जिल्हा परिषद क्षेत्र विकासाच्या दिशेने आगेकूच करत आहे.क्षेत्राचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाल्यापासून माजी केंद्रीय मंत्री तथा खासदार आदरणीय प्रफुल्ल पटेल यांच्या कार्यप्रणालीवर व माजी आमदार राजेंद्र जैन यांच्या मार्गदर्शनाखाली या क्षेत्रात विकासकामांचा सपाटाच लागला आहे.
आज पार पडलेल्या भुमिपुजन सोहळ्यात ग्रामपंचायत परसोडी रै अंतर्गत पांढरवाणी/माल दलित वस्ती सुधार योजना अंतर्गत सिमेंट रस्ता ५.००लक्ष रु,मौजा पांढरवाणी/रै येथे नागरी सुविधा योजना अंतर्गत सिमेंट रस्ता बांधकाम ८.०० लक्ष रु, मौजा परसोडी रै येथे नागरी सुविधा योजना अंतर्गत सिमेंट रस्ता व नाली बांधकाम ८.०० लक्ष रु, मौजा खोली येथे नागरी सुविधा योजना अंतर्गत जिल्हा परिषद शाळा सौंदर्यीकरण ८.००लक्ष रु, ग्रामपंचायत कोहलगाव येथे दलित वस्ती सुधार योजना अंतर्गत सिमेंट रस्ता बांधकाम ५.०० लक्ष रु, १५ वा वित्त आयोग जिल्हा स्तर पाणी पुरवठ्यासाठी ५.०० लक्ष रु, मौजा रांजीटोला येथे जन सुविधा योजना अंतर्गत सभामंडप बांधकाम १०.०० लक्ष रु, जिल्हा निधी अंतर्गत ३.०० लक्ष रु, मौजा झाशीनगर येथे जिल्हा वार्षिक योजना अंतर्गत नवीन वर्गखोली बांधकाम १३.५ लक्ष रु, दलित वस्ती सुधार योजना अंतर्गत सिमेंट नाली बांधकाम ५.०० लक्ष रु, ग्रामपंचायत रामपुरी अंतर्गत मौजा रामपुरी येथे १५ वा वित्त आयोग अंतर्गत सिमेंट रस्ता बांधकाम ६.०० लक्ष रु, मौजा येलोडी येथे दलित वस्ती सुधार योजना अंतर्गत सिमेंट रस्ता ५.०० लक्ष रु व १५ वा वित्त आयोग अंतर्गत बंदिस्त नाली ५.०० लक्ष रु, मौजा जांभळी येथे दलित वस्ती सुधार योजना अंतर्गत सिमेंट नाली बांधकाम ५.०० लक्ष रु, मौजा पवनी धाबे येथे जिल्हा वार्षिक योजना अंतर्गत नवीन वर्गखोली बांधकाम १३.५० लक्ष रु, दलित वस्ती सुधार योजना अंतर्गत सिमेंट रस्ता बांधकाम ५.०० रु अशा विविध विकासकामांचे भूमिपूजन संपन्न झाले.
यावेळी मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर वसलेला माझा क्षेत्र आणि माझा क्षेत्र विकासाच्या दृष्टीने मागे पडला होता, त्यामुळे क्षेत्रात विकासकामांची गंगा कशी आणता येईल व आपल्या क्षेत्रातील गावात विकास कामे कशी होतील यासाठी मी सदा प्रयत्न करत राहील,मला आपण आपला प्रतिनिधी म्हणून जिल्हा परिषदेत पाठवले या संधीचे सोने करुन घेण्यासाठी सतत प्रयत्नशील राहुन माझ्या कार्यकाळात या क्षेत्राचा चेहरामोहरा बदलण्यासाठी प्रयत्न करीत राहणार कारण या क्षेत्राचा विकास हाच माझा ध्यास आहे,असे प्रतिपादन केले.
सदर भुमिपुजन सोहळ्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तालुकाध्यक्ष लोकपाल गहाणे, गणेश ताराम सरपंच रामपुरी, रविंद्र नाईक सरपंच झाशीनगर, बळीराम टेंभुर्णे सरपंच कोहलगाव, उपसरपंच हरिश्चंद्र घरत,पपिताताई नंदेश्वर सरपंच पवनी धाबे,वनिताताई नागपुरे ग्रामपंचायत सदस्य परसोडी रै, भास्कर गदवार, संतोष नागपुरे,गुलाब साखरे,भिमराव नंदेश्वर,कलिराम काटेंगे,शिवलाल कोरेटी, देविदास राउत,संजय मोहुर्ले, सुभाष डोंगरवार,अमरचंद वाघमारे, मुख्याध्यापक गायकवाड,प्रशांत हर्षे, रामगोपाल प्रधान,व्यंकट मेळे,योगेश्वर ताराम, मोरेश्वर ताराम, पुरुषोत्तम झोळे, हरिश्चंद्र ताराम,ईश्वरदास अलोने,शरद शहारे, श्रीराम राउत, संतोष शहारे, रामेश्वर घुगुसकार, मुन्नीबाई मडावी, लक्ष्मी चाचेरे, वनिता शेंदरे व गावकरी उपस्थित होते.