गोंदिया, : गोंदियात दरवर्षीप्रमाणे यंदाही दसरा मैदानावर पार पडला. जय अंबिका सार्वजनिक दुर्गा उत्सव समिती, दसरा मैदान उत्सव समितीच्या वतीने उज्जैनच्या बाबा महाकालेश्वर मंदिराची 9 दिवसीय भव्य झांकी आयोजित करण्यात आली आहे. या आगळ्यावेगळ्या झांकीचे स्वरूप खास भाविकांसाठी तयार करण्यात आले असून, यामध्ये बाबा महाकालेश्वरांची विविध रूपे दाखवण्यात आली आहेत. 51 फूट उंचीचे बाबा महाकालेश्वर मंदिर हे या झांकीचे मुख्य आकर्षण आहे, या मंदिराकडे भाविक मोठ्या भक्तीभावाने पाहत आहेत.
दर्शन व महाप्रसाद या भव्य सोहळ्यात सहभागी होण्यासाठी गोंदिया व आसपासच्या जिल्ह्यातून भाविक मोठ्या संख्येने येत आहेत. समिती गेली २७ वर्षे दुर्गामातेच्या या उत्सवाची स्थापना व आयोजन करत असून, मोफत महाप्रसादीचे वाटपही गेली १६ वर्षे अविरतपणे सुरू आहे. हा धार्मिक कार्यक्रम परिसरातील नागरिकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला असून, या ठिकाणी भाविकांना महाप्रसादाचा लाभ घेऊन आत्मिक शांती मिळते.
जय अंबिका सार्वजनिक दुर्गा उत्सव समिती, दसरा मैदान यांनी साकारलेली ही झांकी गोंदिया शहराच्या धार्मिक व सांस्कृतिक वारशाचा महत्त्वाचा भाग आणि भाविकांच्या श्रद्धेचे प्रतीक बनली आहे.