सडक अर्जुनी दि.९.-ग्रामपंचायत खोडशिवनी येथे महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत मंजूर झालेल्या खालील कामांचे भूमिपूजन गंगाधर परशूरामकर सरपंच,डॉ. आर.बी. वाढई पंचायत समिती सदस्य यांच्या हस्ते करण्यात आले.
बस स्टाँप ते उप आरोग्य केंद्र सिमेंट रस्ता बांधकाम दुरुस्ती प्राथमिक आरोग्य केंद्र ते पटाची दाण सिमेंट रस्ता बांधकाम, महादेव मेश्राम ते बौद्ध विहार सिमेंट रस्ता बांधकाम दुरुस्ती, व्यंकट परशुरामकर ते गोवर्धन परशुरामकर सिमेंट रस्ता बांधकाम, विजय बारापाञे ते योगराज कापगते बंधिस्त सिमेंट नाली बांधकाम, प्रमोद मस्के ते एकलव्य स्मारक बंधिस्त सिमेंट नाली बांधकाम, भोलानाथ कापगते ते इसरु मौजे बंधिस्त सिमेंट नाली बांधकाम, रामचंद्र मेश्राम ते उमराव लंजे बंधिस्त सिमेंट नाली बांधकाम ,सेवंता मेश्राम ते रामचंद्र मेश्राम बंधिस्त सिमेंट नाली बांधकाम,आनंदराव लंजे ते रतन डोंगरवार बंधिस्त सिमेंट नाली बांधकाम , ग्रामपंचायत ते सुभाष मेश्राम बंधिस्त सिमेंट नाली बांधकाम, प्राथमिक आरोग्य केंद्रा समोरील क्रिडांगण सपाटीकरण , बौद्ध विहार ते ओमप्रकाश हुमणे रस्ता दुतर्फा पेव्हिंग ब्लाँक बसविणे, पुष्पा बावणे ते बौद्धविहार रस्ता दुतर्फा पेव्हिंग ब्लाँक बसविणे, बस स्टाँप परिसरात पेव्हिंग ब्लाँक बसविणे , अंगणवाडी क्र. २ व ३ येथे आवार भिंत बांधकाम, सार्वजनिक नँडेफ बांधकाम सदर कार्यक्रमाला उपसरपंच सत्यवान नेवारे ,चंद्रशेखर मेश्राम सदस्य, ओ.एन.कापगते ग्रामपंचायत अधिकारी, श्री. बनसोड अभियंता पंचायत समिती, पोलीस पाटील भृंगराज परशुरामकर, रामू मस्के तंटामुक्त समिती अध्यक्ष, उध्दव परशुरामकर अध्यक्ष सेवा. सह.संस्था, महेश बोरकर अध्यक्ष शालेय व्यवस्थापन समिती, सौ. योगिता परशूरामकर, सौ. छाया खोब्रागडे, श्रीमती देवकन्या राऊत अंगणवाडी सेविका, तसेच इतर मान्यवर मंडळी उपस्थित होते.