निवडणूक विषयक सोपविलेली कामे गांभीर्याने पार पाडा-जिल्हाधिकारी

0
109
  • प्रत्येक शासकीय कार्यालयात मतदान जनजागृती फोरम कार्यान्वित होणार

 गोंदियादि.11 :  विधानसभा निवडणूक 2024 कामकाजासाठी विविध कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. या कक्षात नोडल अधिकारी व कर्मचारी यांना निवडणूक कामासाठी नियुक्त्या करण्यात आल्या असून नियुक्त अधिकारी -कर्मचारी यांनी निवडणूक विषयक सोपविलेली कामे गांभीर्याने पार पाडावीत, असे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी प्रजित नायर यांनी दिले.

आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहामध्ये विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 विषयक बैठकीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी ते बोलत होते. जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी एम.मुरूगनंथम, उपजिल्हा निवडणूक अधिकारी किरण अंबेकर, महावितरणचे कार्यकारी अभियंता ध्म्मदीप फुलझेले, आनंद जैन, अतुल मेश्राम, याच्यासह कर्मचारी आदीची उपस्थिती होती.

विधानसभा निवडणूक 2024 कार्यक्रमाच्या अनुषंगाने स्वीपच्या माध्यमातून जास्तीत जास्त मतदानाची टक्केवारी वाढविण्याच्या दृष्टीने उदिष्ट पूर्ण करणे आवश्यक असून यासाठी सर्वानी प्रयत्न करावेत तसेच निवडणुकीच्या अनंषंगाने सोपविलेली कामे अर्लट  मोडवर राहु पूर्ण करा कोणतीही चुक होणार नाही याची सर्वांनी काळजी घ्या, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिले.

मतदान जनजागृती वाढविण्यासाठी आणि मतदानापासून एकही नागरिक वंचित राहणार नाही यासाठी प्रत्येक शासकीय कार्यालयामध्ये मतदान जनजागृती फोरमची स्थापना करून कार्यालयामध्ये  कार्यरत अधिकारी व  कर्मचारी यांनी त्यांचे नातेवाई व शेजारी यांना मतदान जनजागृतीसाठी प्रोत्साहित करणार आहेत. तसेच सर्व कार्यालय प्रमुखांनी आपल्या कार्यालयात मतदान जनजागृती फोरम स्थापन करण्याच्या सुचना जिल्हाधिकारी तथा निवडणुक निर्णय अधिकारी प्रजित नायर यांनी यावेळी दिल्या.