
गोंदिया, दि.11 : राज्य विधी सेवा प्राधिकरण उच्च न्यायालय मुंबई यांच्या आदेशानुसार जिल्हा विधी सेवा प्राधिकरण जिल्हा न्यायालय व जिल्हा वकील संघ गोंदिया यांच्या संयुक्त विद्यमाने ‘स्वच्छता ही सेवा’ या राष्ट्रीय मोहिम अंतर्गत 27 सप्टेबर 2024 रोजी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे अध्यक्ष अरविंद वानखेडे यांचे अध्यक्षतेखाली तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव नरेश वाळके यांचे मार्गदर्शनाखाली जिल्हा न्यायालय गोंदिया येथील न्यायालयीन परिसरात स्वच्छता मोहिम राबविण्यात आलेली होती. सदर स्वच्छता मोहिमेमध्ये गोंदिया न्यायालयातील सर्व न्यायीक अधिकारी, न्यायालयीन कर्मचारी तसेच वकील व गोंदिया येथील पॅरा लिगल व्हालंटीअर्स मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदर मोहिमेमध्ये स्वच्छतेसंबंधी विविध प्रकारचे बॅनर व पॉम्पलेट तयार करुन त्याबाबत जनजागृती करण्यात आली.
तसेच 2 ऑक्टोबर 2024 रोजी महात्मा गांधी जयंती निमीत्त ‘स्वच्छता ही सेवा’ मोहिमेअंतर्गत स्वच्छता मोहीम जिल्हा विधी सेवा प्राधिकरण जिल्हा न्यायालय गोंदिया न्यायालयीन परिसरात तसेच इमारतीत राबविण्यात आली. सदर कार्यक्रमात न्यायालयीन परिसरातील साफसफाई तसेच न्यायालयीन इमारतीची स्वच्छता करण्यात आली. सदर स्वच्छता मोहिमेमध्ये गोंदिया येथील सर्व न्यायीक अधिकारी, न्यायालयीन कर्मचारी, वकील तसेच वकील संघाचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.