सेवा संस्थेद्वारे वन्यजीव सप्ताह साजरा

0
71

सेवा संस्था व वनविभाग गोंदिया यांच्या संयुक्त विद्यमानाने विविध कार्यक्रमाचे आयोजन

गोंदिया,दि.१४ः पृथ्वीवर प्रचंड जैवविविधता आहे. परंतु जंगलतोड, वाढते शहरीकरण वन्यजीवांच्या अधिवासावर मानवी अतिक्रमण यासारख्या बाबीमुळे हल्ली माणसाचा जंगली प्राण्यांशी फारसा संबंध येत नाही आणि येतो तेव्हा दोन्ही बाजूंना फारसा आनंददायक नसतो, म्हणचेच मानव वन्यजीव संघर्ष हि परिस्थिती बदलण्यासाठी या वन्यजीव सप्ताहचे आयोजन केले जाते. नामशेष होत चाललेल्या वन्यजीवांचे संरक्षण-संवर्धन करून त्याबद्दल जनजागृती करणे हा त्यामागील हेतू आहे. भारतात सन १९५२ साली पासून वन्यजीव सप्ताह साजरा केला जात आहे.
सेवा संस्था मागील दोन दशकापासून वन्यजीव संरक्षण व संवर्धन या क्षेत्रात कार्यरत आहे. दरवर्षीप्रमाणे या वर्षी सुद्धा सेवा संस्थेद्वारे वनविभागासोबत मिळून वन्यजीव सप्ताह साजरा करण्यात आला. या अनुसंघाने पहिल्या दिवसी जगत हायस्कूल घाटटेमनी येथे सारस पक्षी संरक्षण-संवर्धन व जैवविविधतेवर जनजागृती कार्यक्रम राबविण्यात आले. दुसऱ्या दिवसी पर्यावरण वाचवा-वन्यजीव वाचवा असे उद्घोषणा करत सायकल रैली द्वारे गोंदिया शहरात जनजागृती करण्यात आले. सोबतच वनविभाग गोंदिया येथे जिल्ह्यातील सारस मित्र स्वयंसेवीसाठी सारस पक्षी संवर्धन-संरक्षण चर्चासत्र कार्यशाळाचे आयोजन करून साध्यास्थितीत सारस पक्षी संरक्षण-संवर्धन यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. वन्यजीव सप्ताहच्या चौथ्या दिवसी संत कबीर हायस्कूल सिवनी, संत जयरामदास आदिवासी आश्रम शाळा कामठा येथे सारस पक्षी संरक्षण-संवर्धन व जैवविविधतेवर जनजागृती कार्यक्रम राबविण्यात आले. पाचव्या दिवशी नवीन पिढ्यांमध्ये वन्यजीवांबद्दल जिव्हाळा निर्माण करण्याच्या दृष्टीने गोरेगाव वनपरिक्षेत्र अंतर्गत नवेगाव-नागझिरा बफर क्षेत्रात, जगत विज्ञान कॉलेज गोरेगावच्या विद्यार्थ्यांना निसर्ग भ्रमणाद्वारे वन्यजीवांचे महत्व पटवून देण्यात आले, सोबच धोटे बंधु विज्ञान कॉलेज येथे पोस्टर प्रदर्शनी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. वन्यजीव सप्ताहच्या शेवटी कार्यक्रमाचे समापन कार्यक्रम नवेगाव-नागझिरा येथे करण्यात आला. अश्या प्रकारे पूर्ण सात दिवस विविध ठिकाणी कार्यक्रम घेण्यात आले व वन्यजीव सप्ताह साजरा करण्यात आला.
सदर वन्यजीव सप्ताहला प्रमोद पंचभाई, उपवनसंरक्षक वनविभाग गोंदिया, सावन बहेकार, अध्यक्ष सेवा संस्था याचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. तसेच सर्व शाळा विद्यालयाचे शिक्षक वृंद, वनविभागाचे अधिकारी/कर्मचारी, सारस मित्र यांचे मोलाचे सहकार्य लाभले. सेवा संस्थेचे शशांक लाडेकर,कन्हैया उदापुरे,अविजित परिहार,दुष्यंत आकरे,सुशील बहेकार,डीलेश कुसराम,गौरव मटाले,प्रतिक लाडेकर,भास्कर कापसे,हसीन चिखलोंडे,बबलू चुटे,कैलास हेमने,निशांत कुर्वे यांनी वन्यजीव सप्ताह यशस्वीपणे साजरा करण्यासाठी मोलाची कामगिरी केली.