निवडणुक विषयक दिलेली सर्व कामे निर्धारित वेळेत पूर्ण करा – पुजा गायकवाड

0
1075

        तिरोडा, दि.16 : आदर्श आचारसंहितेचे पालन करून निवडणुक विषयक सोपविलेली सर्व कामे दिलेल्या वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना तिरोडा येथील उपविभागीय अधिकारी पुजा गायकवाड यांनी संबंधितांना दिल्या.

       तिरोडा पंचायत समिती सभागृहामध्ये आयोजित बैठकीत संबोधित करतांना त्या बोलत होत्या. यावेळी तहसिलदार नारायण ठाकरे, गोरेगावच्या तहसिलदार प्रज्ञा बोखरे, तिरोडा न.प. मुख्याधिकारी राहुल परिहार यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

        निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणुकीची घोषणा होताच आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. लोकशाहीचा उत्सव असलेली ही निवडणूक पारदर्शक व मुक्त वातावरणात पार पाडण्याची सर्वांची जबाबदारी आहे. 64-तिरोडा विधानसभा मतदारसंघामध्ये एकूण 2 लाख 70 हजार 96 मतदार आहेत. 295 मतदान केंद्र असून या सर्व मतदान केंद्रावर जास्तीत जास्त मतदारांनी मतदानाचा हक्क बजावावा यासाठी मतदान जनजागृती करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.