मतदानाची टक्केवारी 75 पेक्षा जास्त वाढवा- मुकाअ एम.मुरुगानंथम

0
48

 गोंदिया, दि.18 : लोकशाही बळकट करण्यासाठी मतदान करणे आवश्यक आहे. त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांना जास्तीत जास्त मतदान करण्याबाबत जनजागृती करुन विधानसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी 75 पेक्षा जास्त वाढविण्याचे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम. मुरुगानंथम यांनी केले.

        विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर 17 ऑक्टोबरला जिल्हा परिषदेच्या सभागृहात SVEEP CELL जिल्हा व तालुका नोडल अधिकारी व कर्मचाऱ्यांची आढावा सभा घेण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते.

       यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी किरण अंबेकर यांनी नियोजनबध्द पध्दतीने SVEEP (Systematic Voters’ Education and Electoral Participation) आराखडा तयार करुन त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी करावी अशा सूचना दिल्या.

      सभेला उपविभागीय अधिकारी गोंदिया चंद्रभान खंडाईत, उपविभागीय अधिकारी अर्जुनी मोरगाव वरुणकुमार शहारे, उपविभागीय अधिकारी तिरोडा पुजा गायकवाड, उपविभागीय अधिकारी देवरी कविता गायकवाड तसेच SVEEP नोडल अधिकारी महेंद्र गजभिये, शिखा पिपलेवार आणि तहसिलदार सर्वश्री महेंद्र गणवीर, समशेर पठाण, नारायण ठाकरे, मोनिका कांबळे, प्रज्ञा भोकरे त्याचप्रमाणे तालुका SVEEP नोडल अधिकारी गोंदिया प्रदिप समरीत, तालुका SVEEP नोडल अधिकारी तिरोडा विनोद चौधरी, तालुका SVEEP नोडल अधिकारी स्वाती तायडे, तालुका SVEEP नोडल अधिकारी देवरी गिरीधर सिंगनजोडे, तसेच जिल्हा SVEEP CELLचे केदार गोटेफोडे, सुनैना पानतावणे, चंदू दमाहे, विजय लिल्हारे, सचिन धोपेकर, चंदू दुर्गे, संजय टेंभरे उपस्थित होते.