

गोंदिया,दि.२४ः गोंदिया विधानसभा मतदारसंघाचे भाजप -शिवसेना-राष्ट्रवादी काँँग्रेस अजित पवार पक्ष महायुतीचे उमेदवार विनोद अग्रवाल यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन करीत आपला उमेदवारी अर्ज आज(दि.२४)दाखल केला.स्वागत लाॅन येथून निघालेली ही रॅली,गांधी प्रतिमा मार्गे गोरेलाल चौक,नेहरु चौक होत जयस्तंभ चौकात असलेल्या प्रशासकीय इमारतीसमोर पोचली.अर्ज दाखल करण्याआधी भाजप उमेदवार विनोद अग्रवाल यांना डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण केले. उमेदवारी अर्ज दाखल करतेवेळी भाजपमहायुतीचे उमेदवार विनोद अग्रवाल,विधानपरिषद सदस्य डाॅ.परिणय फुके,राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी आमदार राजेंद्र जैन,माजी आमदार केशवराव मानकर,भाजप जिल्हाध्यक्ष एड.येशुलाल उपराडे,माजी जिल्हा परिषद सदस्य राजेश चतूर आदी उपस्थित होते.विशेष म्हणजे महायुतीतील घटक पक्ष असलेल्या शिवसेनेचा प्रतिनिधी मात्र उमेदवारी अर्ज दाखल करतांना नसल्याने राजकिय चर्चांना उधाण आले आहे.