
फेडरेशनच्या १८० पैकी ७६ तर आविम ४१ केंद्रांना तूर्त परवानगी
गोंदिया – शेतकऱ्यांच्या पाठीशी सदैव खंबीरपणे उभे राहण्याची ग्वाही देत असलेल्या खा. श्री प्रफुल पटेल हे पुन्हा शेतकऱ्यांसाठी धावून आले. निवडणूक आचारसंहितेत अडकलेल्या खरीप हंगामाच्या धान खरेदी प्रक्रियेला मार्गी लावण्यासाठी खा. प्रफुल पटेल यांनी शासनाशी सतत पाठपुरावा केला. त्यामुळे पणन विभागाने मार्केटीग फेडरेशन व आदिवासी विकास महामंडळ या दोन्ही प्रमुख अभिकर्तांना धान खरेदी करण्याच्या सूचना केल्या. परिणामी जिल्हाधिकाऱ्यांनी मार्केटिंग फेडरेशन च्या १८० पैकी ७६ तर आविम च्या ४१ केंद्रांना परवानगी प्रदान केली आहे. तसेच उर्वरित केंद्रही लवकरच सुरु करण्यात येणार आहेत. त्यामुळे शेतकरी खरीप हंगामातील धान विक्री पासून चिंता मुक्त झाले आहे. खा. प्रफुल पटेल यांच्या पाठपुराव्याचे फलित असल्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून त्यांचे आभार मानले जात आहे.
गोंदिया भंडारा सह पूर्व विदर्भात धान शेती केली जाते. सद्या खरीप हंगाम अंतिम टप्प्यावर आहे. अल्प मुदतीच्या धानाची कापणी व मळणी सुरु झाली आहे अनेक शेतकऱ्यांनी दिवाळी सनापूर्वीच्या धानाचे ,मळणी करून घेतली मात्र आधारभूत केंद्र सुरु न झाल्यामुळे शेतकऱ्यांपुढे विक्री चा प्रश्न निर्माण झाला होता. हि बाब माजी आमदार श्री राजेंद्र जैन व राष्ट्रवादी काँग्रेस च्या पदाधिकाऱ्यांनी खा. प्रफुल पटेल यांच्या निदर्शनास आणून दिली. शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सदैव तत्पर असलेल्या खा. प्रफुल पटेल यांनी निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्यापूर्वी राज्य सरकार सह प्रशासकीय अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा केला दरम्यान दिवाळी पूर्वी धान खरेदी सुरु करण्याच्या सूचना केल्या मात्र विधानसभा निवडणुका जाहीर झाल्यामुळे धान खरेदी केंद्र सुरु करण्याच्या प्रक्रियेला विलंब झाले तरी खा. प्रफुल पटेल यांनी पाठपुरावा सतत सुरु ठेवला परिणामी पणन विभागाने धान खरेदी केंद्र सुरु करण्याच्या सूचना केल्यात. त्यानुरूप जिल्हाधिकाऱ्यांनी मार्केटिंग फेडरेशन व आदिवासी विकास महामंडळ या दोन्ही प्रमुख अभिकर्तांच्या नियंत्रणातील अनुक्रमे १८० पैकी ७६ तर आविम ४१ केंद्रांना तूर्त परवानगी प्रदान केली आहे. तसेच उर्वरित केंद्रही लवकरच सुरु करण्यात येणार आहेत. केंद्रांना मंजुरी मिळाल्यामुळे आधारभूत धान खरेदी ला सुरुवात झाली आहे. यामुळे जिल्ह्यतील शेतकऱ्यांची चिंता दूर झाली असून खा. प्रफुल पटेल यांचे आभार मानले आहे.