निवडणूक निरीक्षकांनी घेतला आढावा

0
25

गोंदिया, दि.6 : गोंदिया जिल्ह्यातील विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने आज निवडणूक निरीक्षकांनी निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी यांचा विधानसभा निहाय आढावा घेतला.

         जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहामध्ये आज 6 नोव्हेंबर रोजी आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी निवडणूक खर्च निरीक्षक नागेंद्र भुकया, 63-अर्जुनी मोरगाव विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निरीक्षक सामान्य रामदिनलिअनी, 64-तिरोडा विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निरीक्षक सामान्य सुनिल कुमार, 65-गोंदिया विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निरीक्षक सामान्य मोहित बुंदास, 66-आमगाव विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निरीक्षक सामान्य नितीन सिंह भदौरिया तसेच पोलीस निरीक्षक यांची उपस्थिती होती.

         येत्या 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार असून यासाठी मतदान केंद्रावर आवश्यक असणाऱ्या सुविधा, पीडब्ल्युडी मतदार, स्ट्राँग रुम, चेकपोस्टवर असणाऱ्या FST व SST टिमने संपूर्ण चेकपोस्टवर वाहनांची कसून तपासणी करावी. आवश्यक असल्यास तिरोडा व गोंदिया नाक्यावर पोलीस फौज तैनात ठेवण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या.

           या निवडणुकीत गोंदिया जिल्ह्यात मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी युवक, कामगार, शेतकरी, महिला, विद्यार्थी यांचे सहभाग असणे आवश्यक आहे. याकरीता स्वीप कार्यक्रमांतर्गत जास्तीत जास्त प्रमाणात मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करण्यात यावा. तसेच निवडणूक कालावधीत उमेदवार यांचेकडून मतदारांना प्रभावित करण्यासाठी कोणतेही गैर व्यवहार झाल्यास मतदारांनी, नागरिकांनी त्याची तक्रार सी-व्हिजील ॲपद्वारे शासनापर्यंत पोहोचविण्याचे कार्य करावे यासाठी सी-व्हिजील ॲपची प्रचार-प्रसिध्दी मोठ्या प्रमाणात करावी. भरारी पथकांनी सर्व मुख्य वैकल्पीक मार्गांवर वाहतुक करणाऱ्या वाहनांची कसून तपासणी करावी असे निर्देश यावेळी देण्यात आले.