अर्जुनी मोर.– अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रातील महायुतीचे लोकप्रिय उमेदवार ईंजी.राजकुमार बडोले यांचे प्रचारार्थ राष्ट्रवादी अजीत पवार गटाचे राष्ट्रीय नेते प्रफुल्ल पटेल व माजी खासदार सुनिल मेंढे यांची जाहीर सभा कृषी उत्पन्न बाजार समिती नवेगावबांध येथे 10 नोव्हेंबर ला दुपारी 1:30 वाजता आयोजित करण्यात आली आहे.या सभेला पिरिपाचे जयदीप कवाडे हे सुध्दा उपस्थीत राहुन सभेला मार्गदर्शन करणार आहेत.
अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय उमेदवार ईंजी.राजकुमार बडोले हे भाजपा, राष्ट्रवादी कांग्रेस अजीत पवार गट,तथा आठवले, पिरीपा व मित्रपक्षाचे अधिकृत उमेदवार आहेत.गोंदिया जिल्ह्यात चार विधानसभा क्षेत्रापैकी तिन विधानसभा क्षेत्र भाजपाच्या वाट्याला गेल्याने एकमेव अर्जुनी मोर. विधानसभा क्षेत्र राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार प्रफुल्ल पटेल गटाला मिळाला. राष्ट्रीय नेते प्रफुल्ल पटेल हे गोंदिया जिल्ह्यातील रहिवासी असुन त्यांनी अर्जुनी मोर. विधानसभेची निवडणुक अत्यंत प्रतिष्ठेची केली आहे.महायुतीचे उमेदवार राजकुमार बडोले यांचे प्रचारासाठी प्रफुल्ल पटेल रात्रंदिवस घाम गाळीत आहेत.संपुर्ण राष्ट्रवादीचे कार्यकर्ते जोमाने प्रचारकार्यात लागले आहेत.प्रफुल्ल पटेल हे उमेदवारी अर्ज दाखल करण्याचे दिवसी प्रामुख्याने हजर होते.तर पक्षाचा जाहीरनामा व घोषणापत्र करण्याचे दिवसीसुध्दा प्रफुल्ल पटेल यांनी अर्जुनी मोर. येथे जाहीर सभा घेतली.आणी 10 नोव्हेंबर ला नवेगावबांध येथे दुपारी 1:30 वाजता प्रचार सभेचे आयोजन करण्यात आले आहे.या सभेला महायुतीच्या पदाधिकारी ,कार्यकर्ते व मतदारांनी मोठ्या संख्येनी उपस्थीत राहण्याचे आवाहन लोकपाल गहाणे,विजय कापगते,किशोर तरोणे यांनी केले आहे.