स्वीप अंतर्गत जिल्हाभर महाबाईक रॅलीचे आयोजन

0
93

गोंदिया, दि.9 : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 अंतर्गत मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी SVEEP कार्यक्रमांतर्गत जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी प्रजित नायर यांच्या मार्गदर्शनात मुख्य कार्यकारी अधिकारी तथा SVEEP नोडल अधिकारी एम. मुरुगानंथम यांच्या नियोजनाने दिनांक 11 नोव्हेंबर व 13 नोव्हेंबर 2024 रोजी गोंदिया जिल्ह्यात जिल्हाभर शेकडो मतदारांच्या सहभागाने महाबाईक रॅलीचे आयोजन करण्यात येणार आहे.

         या महाबाईक रॅलीची सुरुवात 11 नोव्हेंबरला गोंदिया तालुक्यातील रावणवाडी गावापासून होत असून तिरोडा, गोरेगाव, सडक अर्जुनी, अर्जुनी मोरगाव, देवरी, सालेकसा, आमगाव फिरत फिरत गोंदियाला पोहोचणार. तसेच 13 नोव्हेंबर रोजी गोंदिया येथील बालाघाट टी पॉईंट वरुन महाबाईक रॅलीची सुरुवात होणार असून संपूर्ण गोंदिया शहरात भ्रमण करुन रॅलीची सांगता जयस्तंभ चौक, गोंदिया येथे होणार आहे.

         या महाबाईक रॅलीत ठरवलेल्या ठिकठिकाणी स्टॉपला गोंदिया जिल्ह्यातील चारही विधानसभा क्षेत्रातील हजारोंच्या संख्येने कर्मचारी व मतदार मोठ्या उत्साहाने सहभागी होणार आहेत. ठिकठिकाणी कर्मचाऱ्यांकडून आकर्षक रांगोळी काढण्यात येणार आहे.

          गटविकास अधिकारी, तालुका नोडल अधिकारी, गटशिक्षणाधिकारी, न.प.मुख्याधिकारी, ग्रामसेवक, तलाठी यांच्या प्रयत्नाने महाबाईक रॅली यशस्वीरित्या पूर्ण करणार आहेत. यामध्ये जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी प्रजित नायर स्वतः महाबाईक रॅलीला मार्गदर्शन करणार आहेत. महाबाईक रॅलीमध्ये जास्तीत जास्त संख्येने सहभागी होऊन लोकशाहीच्या पर्वामध्ये सर्वांनी सहभागी होऊन आपला सहयोग नोंदवावा असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी तथा SVEEP नोडल अधिकारी एम. मुरुगानंथम यांनी केले आहे. विधानसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी 75 पेक्षा जास्त वाढविण्याचे आवाहन केले तसेच नागरिकांनी मतदान करून लोकशाहीला बळकट करावे असेही आवाहन त्यांनी केले.

         ज्या-ज्या ठिकाणी महाबाईक रॅली थांबणार आहे त्या-त्या ठिकाणी रांगोळी व पुष्पगुच्छद्वारे महाबाईक रॅलीचे जंगी स्वागत करण्यात येणार आहे. संपूर्ण महाबाईक रॅलीचे लाईव्ह प्रसारण यूट्यूब वर करण्यात येईल. ड्रोन कॅमेरा द्वारे संपूर्ण महाबाईक रॅलीचे शूटिंग करण्यात येणार आहे.

          उपविभागीय अधिकारी गोंदिया चंद्रभान खंडाईत, उपविभागीय अधिकारी अर्जुनी मोरगाव वरुणकुमार शहारे, उपविभागीय अधिकारी तिरोडा पूजा गायकवाड, उपविभागीय अधिकारी देवरी कविता गायकवाड तसेच SVEEP सहायक नोडल अधिकारी महेंद्र गजभिये, सहायक नोडल अधिकारी शिखा पिपलेवार आणि तहसीलदार महेंद्र गणवीर, तहसीलदार मोनिका कांबळे, तहसीलदार समशेर पठाण, तहसीलदार नारायण ठाकरे, तहसीलदार प्रज्ञा भोकरे, प्रदीप समरीत तालुका SVEEP नोडल अधिकारी गोंदिया, विनोद चौधरी तालुका SVEEP नोडल अधिकारी तिरोडा, स्वाती तायडे तालुका SVEEP नोडल अधिकारी, गिरीधर सिंगनजोडे तालुका SVEEP नोडल अधिकारी देवरी, डी.बी.साकुरे, जिल्हा SVEEP CELL केदार गोटेफोडे, चंद्रशेखर दमाहे, विजय लिल्हारे, सचिन धोपेकर, चंदू दुर्गे, संजय टेंभरे, मुकेश वासनिक, श्रीमती पारधीकर, श्रीमती शेट्टे, मोरेश्वर बडवाईक, आर.एस.चव्हाण, अनुप नागपुरे, मोरेश्वर बडवाईक, नितेश मालाधारी, संजयकुमार बिसेन, हर्षकुमार पवार, नरेंद्र गौतम, उमाशंकर पारधी, दिलीप हिरापूरे, तेजलाल भगत, विलास डोंगरे, प्रमोद खोब्रागडे, कुवरलाल रहांगडाले, प्रमोद पटले सहकार्य करणार आहेत.