तिरोडा विधानसभा मतदारसंघात मतदान यंत्राची दुसरी सरमिसळ प्रक्रिया

0
48

गोंदिया, दि.9  : भारत निवडणूक आयोगाच्या 15 ऑक्टोबर 2024 रोजीच्या अधिसूचनेनुसार महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीचा ‍कार्यक्रम जाहीर करण्यात आलेला आहे. त्याअनुषंगाने तहसिल कार्यालय तिरोडा येथे 9 नोव्हेंबर 2024 रोजी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या दालनात सकाळी 11 वाजता BU, CU, VVPAT चे दुसरे सरमिसळ (Second Randomization) प्रक्रियेबाबत सभा आयोजित करण्यात आली होती. सभेला राष्ट्रीय व राज्य पक्ष आणि अपक्ष उमेदवार तसेच प्रतिनिधी उपस्थित होते. सदर सभा निवडणूक निरीक्षक सुनिल कुमार यांचे समक्ष पार पाडण्यात आली.

         यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी यांनी 64-तिरोडा विधानसभा मतदारसंघामध्ये वापरण्यात येणाऱ्या BU, CU, VVPAT चे दुसरी सरमिसळ प्रक्रिया बाबत उपस्थित सर्व उमेदवार व प्रतिनिधी यांना माहिती देवून BU-708, CU-354, VVPAT-384 असल्याचे सांगितले. तिरोडा विधानसभा मतदारसंघात एकूण 295 मतदान केंद्र आहेत.

         64-तिरोडा विधानसभा मतदारसंघामध्ये वापरण्यात येणाऱ्या BU, CU, VVPAT ची पहिला सरमिसळ प्रक्रिया जिल्हाधिकारी कार्यालयात करण्यात आली. त्यांचेकडून प्राप्त झालेले मतदार संघनिहाय BU-708, CU-354, VVPAT-384 चे 9 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी 11.30 वाजता तहसिल कार्यालय तिरोडा येथे उपस्थित उमेदवार व त्यांचे प्रतिनिधी यांच्या समक्ष प्रात्यक्षिक करुन दाखविण्यात आले, त्यांचे समाधान झाल्यानंतर मतदान यंत्राची दुसरी सरमिसळ प्रक्रिया पार पाडण्यात आली.