अर्जुनी मोर.-अर्जुनी – मोरगाव विधानसभा क्षेत्रातील महायुतीचे उमेदवार राजकुमार बडोले यांच्या निवडणूक प्रचारार्थ ग्राम पांढरी येथे विकास बागडकर यांच्या निवासस्थानी माजी आमदार राजेंद्र जैन यांच्या प्रमुख उपस्थितीत महायुतीतील पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक संपन्न झाली. यावेळी राजेंद्र जैन यांनी आपल्याला उमेदवार निवडून आणायचे असेल तर प्रत्येक गावातील बूथवर महायुतीतील कार्यकर्त्यांमध्ये समन्वय साधून काम करावे लागेल कार्यकर्ता कार्यक्षम असेल तर विजय मिळवणे अवघड नसतो, आपल्याला विजयासाठी काम करायचे आहे व खा. प्रफुल पटेलजी यांच्या नेतृत्वाला मजबुत करून या भागातील विकासाला गती देण्यासाठी महायुतीचे उमेदवार यांना बहुमतांनी निवडून द्या असे आवाहन राजेंद्र जैन यांनी केले.
यावेळी बैठकीला सर्वश्री राजेंद्र जैन, अविनाश काशिवार, सुधाताई रहांगडाले, संगीताताई खोब्रागडे, डी यु रहांगडाले, गजानन परशुरामकर, तानूभाऊ रहांगडाले, दिलीप कापगते, निशा काशीवार, विकास बागडकर, नरेश भेंडारकर, मुनेश्वर कापगते, विश्वनाथ रहांगडाले, शीलाताई चव्हाण सहित महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ता उपस्थित होते.