Home विदर्भ ओबीसी आरक्षणासह 66 प्रश्न अधिवेशऩासाठी-आ.होळी

ओबीसी आरक्षणासह 66 प्रश्न अधिवेशऩासाठी-आ.होळी

0

गडचिरोली,दि.१६:सोमवार १८ जुलैपासून सुरु होणाऱ्या सरकारच्या विधानसभा अधिवेशनासाठी आपण ६६ प्रश्न पाठविले असून, त्यात सिंचन, ओबीसी आरक्षण व अन्य प्रश्नांचा समावेश असल्याची माहिती आ.डॉ.देवराव होळी यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
आ.डॉ.होळी यांनी सांगितले की, ६६ प्रश्नांमध्ये ४१ तारांकित, २० लक्षवेधी व अर्धा तास चर्चेतील ५ प्रश्नांचा समावेश आहे. ओबीसींचे कपात झालेले आरक्षण पूर्ववत करावे, वनकायदा शिथिल करुन किमान ९ हजार हेक्टर वनजमीन प्रकल्पांसाठी द्यावी, बंगाली समाजाला जातीचे प्रमाणपत्र व मालमत्ता कार्ड द्यावे, झाडे-झाडीया समाजाला कोणत्याही एका प्रवर्गात समाविष्ट करावे, पेसा कायद्यात सुधारणा करावी, गडचिरोलीतील महिला रुग्णालयासाठी तत्काळ पदे मंजूर करावीत इत्यादी प्रश्न आपण विधानसभेत उपस्थित करणार आहोत, असे आ.डॉ.होळी यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला भाजपचे ज्येष्ठ नेते प्रकाश अर्जुनवार, गोवर्ध्रन चव्हाण, नंदू काबरा, जिल्हा परिषद सदस्य प्रशांत वाघरे, सलिम बुधवानी, सुधाकर येनगंधलवार, प्रमोद पिपरे, डॉ.भारत खटी, विनोद देवोजवार, नरेंद्र भांडेकर, सुनील बावणे, अनिल कुनघाडकर उपस्थित होते.

Exit mobile version