गोंदिया -मां भगवती एवं विठ्ठल रुखमाई देवस्थान गणेश मंदिर परिसर, मौजा पारडीबांध (डोंगरगाव) ता.गोंदिया येथे श्रीमद् भागवत कथा वाचक प.पू. ह.भ.प. कल्पणाताई ठाकूर (आळंदीकर) यांच्या अमृतवाणीतून श्रीमद भागवत ज्ञानयज्ञ सप्ताह कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. श्रीमद् भागवत कथेचा लाभ घेत माजी आमदार राजेंद्र जैन यांनी श्रीमद भागवत पुराणची मनोभावे पुजा केली व आशिर्वाद घेतला.
याप्रसंगी माजी आमदार राजेंद्र जैन म्हणाले की, भागवत कथेचे मानवी जीवनात खूप महत्त्व आहे. कथा श्रवण केल्याने मोक्ष ची प्राप्ती होते आणि मनाची शुद्धी होते. प्रत्येक मानवाने भागवतांची संपूर्ण कथा ऐकावी. भागवताने भक्ती तर भक्ती ने शक्तीची प्राप्त होते आणि मानवी जीवनातील सर्व विकार नष्ट होतात. कथा श्रवणाने माणसाच्या वाईट विचारांचा नाश होऊन चांगले विचारांसह ज्ञान अर्जन करणे सोपे होते. श्रीमद भागवत ज्ञानयज्ञ सारखे भक्तिमय कार्यक्रम मानवी जीवनाला दिशा देत असतात.
याप्रसंगी राजेंद्र जैन, रविकुमार पटले, आनंदाताई वाढीवा, अंजलीताई अटरे, नितिन टेंभरे, पदमलाल चौरीवार, मायाबाई चौधरी, ज्ञानचंद जमईवर, सुनील पटले, रौनक ठाकुर, नंदू ऊके, गेंदलाल साखरवाडे सहित मान्यवर तथा भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.