Home विदर्भ नक्षलवाद्यांच्या प्रचाराला बळी पडू नका:डाॅ. भुजबळ

नक्षलवाद्यांच्या प्रचाराला बळी पडू नका:डाॅ. भुजबळ

0

डुग्गीपार व दर्रेकसा भागात आढळली नक्षल पत्रके
‘नक्षल शहीद सप्ताह’ दरम्यान एस.टी.बस सेवा बंद राहणार
गोंदिया,दि.28- आजपासून 3 आॅगस्ट पर्यंत नक्षलवाद्यांकडून नक्षल सप्ताह पाळला जाणार आहे. या नक्षल सप्ताह निमित्त नागरिकांत भीतीचे वातावरण तयार करून आपली षक्ती दाखविण्याचा खटाटोप करणा-या नक्षलवाद्यांच्या खोटया प्रचाराला जनतेने बळी पडू नये असे आवाहन गोंदिया जिल्हा पोलिस अधीक्षक डाॅ. दिलीप पाटील भुजबळ यांनी केले आहे. 28 जुलै ते 3 आॅगस्ट दरम्यान दरवर्शी नक्षलवाद्यांकडून ‘नक्षल शहीद सप्ताह ’ साजरा केला जातो. या काळात गोंदिया , गडचिरोली ,बालाघाट व राजनांदगाव या सीमावर्ती जिल्हयात आदिवासी नागरिकांना शासनाच्या विरोधात भडकावून लोकषाहीपासून दूर नेण्याचा प्रयत्न नक्षलवाद्यांकडून केला जातो. या साठी ते प्रचार प्रसार चा माध्यम म्हणून पत्रके घालून दहषत पसरविण्याचा प्रयत्न करतात. अष्याच प्रकारचे काही पत्रके सडक अर्जुनी तालुक्यातील डुग्गीपार पोलिस ठाण्यांतर्गत व सालेकसा तालुक्यातील दर्रेकसा पोलिस चैकी अंतर्गत येणा-या काही गावात आढळले. त्याची खबरदारी घेण्यात आली असून या नक्षल सप्ताह दरम्यान कुठलाही अनुचित प्रकार जिल्हयात घडू नये याकरिता पोलिस प्रषासन जनतेला सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. डाॅ. भुजबळ यांनी सांगितले की या दरम्यान जनतेत भीती पसरविण्यासाठी जिलेटीन, पिट्टू, वाकीटाॅकी, आदी साहित्य कुठेही आढळून आल्यास पोलिस पाटील किंवा पोलिस मित्रांच्या माध्यमातून पोलिसांना कळवावे. यावेळी बोलतांना नक्षल सप्ताहच्या पाष्र्वभूमीवर 26 जुलै रोजी गोंदिया राजनांदगाव, बालाघाट व गोंदिया-गडचिरोली नक्षल परिक्षेत्राच्या वरिश्ठ पोलिस अधिका-यांची समन्वय बैठक पार पडली. या बैठकीत गेल्या मार्च महिन्यापासून बालाघाट सह सीमावर्ती जिल्हयात नक्षलांच्या घडलेल्या हाल चालीवर चर्चा करण्यात आली. तसेच संयुक्त अभियान राबवून नक्षलवाद्यांचे मनसूबे हाणून पाडण्यासाठी व्यूहरचना आखण्यात आली असल्याचेही त्यांनी संागितले. या बैठकीला मध्यप्रदेषातील भोपाल विभागाचे पोलिस महानिरीक्षक ,छत्तीगड राज्यातील राजनांदगाव विभागचे पोलिस महानिरीक्षक आणि गोंदिया-गडचिरोली नक्षल विभागाचे उपमहानिरीक्षक यांच्यासह पोलिस अधीक्षक उपस्थित होते.

Exit mobile version