२४ पोलिस अधिकारी-कर्मचाऱ्यांना पोलिस महासंचालक पदक जाहीर

0
179

गोंदिया,दि.३०: महाराष्ट्र पोलिस दलामध्ये विविध प्रकारच्या प्रवर्गात केलेल्या उत्तम कामगिरीबद्दल आणि राष्ट्रपती यांचे गुणवत्तापूर्ण सेवेचे पदक व शौर्यपदक प्राप्त पोलिस अधिकारी व अंमलदारांना बोधचिन्ह-सन्मानचिन्ह प्रदान करण्यात येते. त्यानुसार, सन-२०२४ या वर्षाकरिता जिल्ह्यातील २४ पोलिस अधिकारी-कर्मचाऱ्यांना पोलिस महासंचालकांचे सन्मानचिन्ह जाहीर झाले असून १ मे रोजी पालकमंत्र्यांच्या हस्ते या अधिकाऱ्यांना पोलिस महासंचालकांचे सन्मानचिन्ह प्रदान करण्यात येणार आहे. यात राज्य राखीव पोलिस बल गट क्रमांक-१५ गोंदिया येथील पोलिस उपअधीक्षक कमलाकांतसिंह बबनसिंह, शहर ठाणेदार किशोर पर्वते,सहायक पोलिस निरीक्षक चेतन ढेकणे, जनार्धन हेगडकर, पोलिस उपनिरीक्षक भारत पांढरे, शुभम नवले, ग्रेड पोलिस उपनिरीक्षक नमुदेव सोनवाने, सहायक पोलिस उपनिरीक्षक अनेश राठोड, थुमेश्वर जगनाडे, प्रवीण जवंजाळ,पोलिस हवालदार रामकिशन मेहेर,राजेंद्र मिश्रा,जयप्रकाश शहारे,जयंत सोनडवले,नोव्हेश मस्के,गिरीश पांडे,बलराज लांजेवार,महेश मेहर,इंद्रजित बिसेन,सुशील रामटेके,पोलिस शिपाई नितीन दिवटे, जितेश शिंदे, महेंद्र उके, नितीन डुंबरे यांचा समावेश आहे.