गोंदिया, दि.1 : आज विविध क्षेत्रात नवनवीन तंत्रज्ञान विकसीत करण्यात आले आहे. रोजगार निर्मितीला गती देण्यासाठी तसेच उद्योजकतेला चालना देण्याकरीता आज 1 मे रोजी शासकीय तंत्रनिकेतन गोंदिया येथे ‘इनक्युबेशन कम बिझनेस फॅसिलिटेशन सेंटर’चे राज्याचे सहकार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते फित कापून उद्घाटन करण्यात आले. यावेळी खासदार नामदेव किरसान, आमदार राजकुमार बडोले, जि.प.अध्यक्ष लायकराम भेंडारकर, उपाध्यक्ष सुरेश हर्षे, जिल्हाधिकारी प्रजित नायर, जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी एम.मुरुगानंथम, पोलीस अधीक्षक गोरख भामरे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
पालकमंत्री श्री. पाटील म्हणाले, शासकीय तंत्रनिकेतन गोंदिया येथे जिल्हा नियोजन समिती गोंदिया मार्फत अंदाजे 1 कोटी रुपये खर्च करुन अद्यावत तसेच नाविन्यपूर्ण इनक्युबेशन कम बिझनेस फॅसिलिटेशन सेंटर बनविण्यात आले असून जिल्ह्यातील नागरिकांच्या सेवेत आज 1 मे 2025 रोजी समर्पीत करण्यात येत आहे. याद्वारे उद्योजकतेला चालना देणे, रोजगार निर्मितीला गती देणे, कृषि व इतर उद्योगामध्ये नाविण्य घडविणे, गोंदियाला स्टार्ट हब बनविणे, स्टार्ट अपसाठी व्यवसायिक पाठबळ, महिला उद्योजकांसाठी विशेष प्रोत्साहन, व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन, गुंतवणूक संधी व निधी मिळविण्यासाठी मदत, कौशल्य विकास व प्रशिक्षण कार्यशाळा, संशोधन व उत्पादन विकास सहाय्य आदी बाबींवर भर देण्यात येणार आहे असे त्यांनी यावेळी सांगितले.
कार्यक्रमास उपजिल्हाधिकारी मानसी पाटील, जिल्हा नियोजन अधिकारी सुनील धोंगडे, सा.बां.विभागाचे कार्यकारी अभियंता नरेश लभाने, न.प.मुख्याधिकारी श्रीकांत कांबळे, तहसिलदार समशेर पठाण, शासकीय तंत्रनिकेतन गोंदियाचे प्राचार्य चंद्रहास गोळघाटे, कौशल्य विकास विभागाचे सहायक आयुक्त राजु माटे यांचेसह शासकीय तंत्रनिकेतन गोंदिया येथील संपूर्ण स्टाफ उपस्थित होते.