आरोग्य विभागाने मानवी साखळीद्वारे केली राष्ट्रीय आरोग्य योजनांची जनजागृती

0
28

गोंदिया-महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 दशक पूर्ती सेवा बाबत दि.28 एप्रिल 2025 रोजी सेवा हक्क दिनाच्या अनुषंगाने आरोग्य विभाग जिल्हा परिषद गोंदिया व राष्ट्रीय आरोग्य अभियान यांच्या एकत्रित सहकार्याने जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.नितीन वानखेडे, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ.तृप्ती कटरे यांच्या मार्गदर्शक सुचनेनुसार जिल्हा माता व बाल संगोपन अधिकारी डॉ रोशन राऊत, राष्ट्रीय आरोग्य अभियान जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक अर्चना वानखेडे, जिल्हा माध्यम व विस्तार अधिकारी विजय आखाडे,आय.इ.सी. अधिकारी प्रशांत खरात यांचे उपस्थितीत आरोग्य विभाग व राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालयातील अधिकारी, समन्वयक व कर्मचारी यांचे उपस्थितीत आरोग्य कार्यक्रम व योजना लोकांना जनजागृती होण्याच्या दृष्टीने बॅनर व पोष्टर च्या माध्यमातून जिल्हा परिषद येथील मध्यवर्ती सारस चौकात मानवी साखळीद्वारे जनजागृती करण्यात आली.
मानवी साखळीद्वारे जनजागृती कार्यक्रम हा एक लोकप्रिय आणि प्रभावी मार्ग आहे. हे एक टिमवर्क जनजागृती माध्यम आहे.महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 ह्या अधिनियमामुळे विविध सेवाबाबतची माहिती व प्रत्यक्ष लाभ लोकांपर्यत पोहचु लागला. महाराष्ट्र राज्य हे लोकाभुमिक व अग्रेसर राज्य म्हणुन देशात प्रसिद्ध आहे.महाराष्ट्र सरकारने बरोबर दहा वर्षापर्वी दि. 28 एप्रिल 2015 रोजी राज्यात  सेवा हक्क दिनाच्या अनुषंगाने विविध योजना व लाभ तळागळातील जनतेला पोहचविण्याच्या दृष्टीकोनातुन अधिनियमातुन विविध सेवा सुलभ लोकापर्यंत पोहचु लागले.
आरोग्य विभागाच्या वतीने सेवा दिनाचे औचित्य साधुन नागरिकांना आरोग्य विषयक कार्यक्रमे व योजनांची माहीती मिळ्ण्याच्या दृष्टीकोनातुन ह्यावेळी जननी सुरक्षा योजना, प्रधानमंत्री मातृवंदन योजना,जननी शिशु सुरक्षा कार्यक्रम, माहेर घर योजना, मानव विकास कार्यक्रम,नवसंजीवनी मातृत्व अनुदान योजना,आयुष्मान भारत प्रधानमंत्री भारत योजना, महात्मा ज्योतीबा फुले जनआरोग्य योजना,अँनिमिया मुक्त भारत कार्यक्रम,नियमित लसीकरण कार्यक्रम, कुटुंब कल्याण कार्यक्रम ई.विविध कार्यक्रमाची माहीती ह्यावेळी जिल्हा परिषद येथील सारस चोकात मानवी साखळीद्वारे आरोग्य कर्मचार्यामार्फत करण्यात आल्याची माहीती जिल्हा माता व बाल संगोपन अधिकारी डॉ.रोशन राऊत ह्यावेळी दिली आहे.सदर जनजागृती करण्यासाठी डॉ.तनया चौधरी,संकेत मोरघरे,दिनेश माकिजा,कैलाश चिचामे, कैलाश खांडेकर,पवन फुंडे,राकेश राकडे, संजय दोनोडे, राजेश दोनोडे, मनिशा देशमुख. कल्याणी चौधरी, मंजु रहांगडाले,डॉ.श्रुती राणा,अल्का मिश्रा,डॉ.पंकज पटले,भुमी देशमुख,लक्ष्मी सावरकर, सारनाथ बोरकर,सपना खंडाईत,विरेंद्र उके,उकादास बिसेन,अजय यांनी सहकार्य केले.