गोर्रे येथील नहरातील पाण्याच्या प्रवाहात दोन मुले वाहून गेली

0
138

गोंदिया,दि.०२- अंघोळीसाठी कालव्यात उतरलेले दोन युवक वाहून गेले. ही घटना शुक्रवारी (ता. २) दुपारी १२ च्या सुमारास निंबाटोला येथे घडली. प्रशांत नरेंद्र पटले (वय २१) व प्रतीक दौलत बिसेन (वय २१, दोघेही रा. गोर्रे) अशी वाहून गेलेल्या युवकांची नावे असून शोध पथकाला त्यांचे मृतदेह मिळाले आहेत.
गोर्रे गावालगत पुजारीटोला धरणाचा कालवा निंबाटोलाजवळ सुरू असून या कालव्यात दुपारी बाराच्या सुमारास गोर्रे येथील तीन युवक अंघोळ करायला गेले होते. कालव्यात उतरल्यावर पाण्याचा अंदाज न आल्याने प्रशांत पटले व प्रतीक बिसेन हे कालव्यात वाहून गेले. याबाबतची माहिती त्यांच्यासोबत अंघोळीसाठी गेलेल्या सुमीत रमेश बिसेन याने गावात येऊन गावकऱ्यांना माहिती दिली.