अवैद्य रेतीच्या वाहनावर तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर यांची कारवाई!

0
63

1 लाख 80 हजार ठोठावला दंड!

रिसोड  : रिसोड महसूल प्रशासनाच्या वतीने तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर (Tehsildar Pratiksha Tejankar) यांच्या नेतृत्वात रेतीची अवैद्य वाहतूक करणाऱ्या, वाहनावर 1 मे च्या रात्री बारा वाजता कारवाई करण्यात आली. मिळालेल्या प्राप्त माहितीनुसार, रिसोडच्या तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर यांना 1 मे च्या रात्री साडेअकरा वाजता गुप्त माहिती मिळाली की, लोणी ते रिसोड मार्गावरील भर जहागीर येथील आसरा माता दरम्यान असलेल्या, रस्त्यावर एका ट्रक मधून रेतीची अवैध वाहतूक  करण्यात येत आहे. मिळालेल्या गुप्त माहितीनुसार रिसोडच्या तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर यांनी महसूल प्रशासनाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यासह 1 मे च्या रात्री बारा वाजता मिळालेल्या, गुप्त माहितीप्रमाणे घटनास्थळी दाखल होऊन घटनास्थळी उभ्या असलेल्या ट्रकची पाहणी केली असता, ट्रक क्रमांक एमएच 37 टी 9989 मध्ये चार ब्रास रेती असल्याचे आढळून आले. सदर रेतीबाबत ट्रकचालक रामेश्वर वामन राठोड राहणार देवठाणा तालुका मंठा यांना विचारणा केली असता, त्याच्याजवळ रेतीच्या वाहतुकीच्या परवान्याबाबत कोणतेही कागदपत्रे आढळून न आल्याने रेतीचे अवैध वाहतूक करीत असल्याचे निष्पन्न झाले. सदर ट्रकचा घटनास्थळी पंचनामा करून 1 लाख 80 हजार रुपये दंड ठोठावण्यात आला आहे व सुरक्षेच्या दृष्टिकोनातून चार ब्रासच्या रेतीसह ट्रक रिसोड येथील पोलीस स्टेशनमध्ये जमा करण्यात आला आहे. रेतीची अवैध वाहतूक करणारा सदर ट्रक हा दिलीप राऊत लाखाला, वाशिम यांचा असल्याचे समजते. सदरची कारवाई रिसोडच्या तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर यांच्या नेतृत्वात मंडळ अधिकारी एस. एम. पडवे , सुनील लोखंडे, पटवारी स्वप्निल धांडे, जि. जि. गरकळ, लखन उसारे, महसूल सेवक मुधोळकर यांच्या पथकाने केली. सदरच्या कारवाईने रेतीची अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनधारकासह रेती तस्करांमध्ये एकच खळबळ उडाली आहें.