महिला सशक्तिकारण म्हणजे आर्थिक समाजिक समरसता:- खा. किरसान

0
31

महाराष्ट्राच्या उन्नती करिता महिलांचा शिहाचा वाटा-खा.भारती पारधी

# सांस्कृतिक कला महोत्सवात स्त्री शक्तीचा गजर

आमगांव:- येथील भारतीय जनकल्याण फाउंडेशन व रिपोर्टर फोरम यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र व कामगार दिन निमित्त कृषि उत्पन्न बाजार समिती आमगाव येथे महिलांकारिता सांस्कृतिक कला महोत्सव व रोजगार मार्गदर्शन आयोजित करण्यात आले.
आयोजित कार्यक्रमात अध्यक्ष स्थानी खासदार श्रीमती भारती पारधी बालाघाट लोकसभा क्षेत्र,उदघाटक म्हणून गडचिरोली लोकसभा क्षेत्राचे खा. डॉ. नामदेवराव किरसान, प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुरेश हर्षे,भारतीय जनकल्याण, फाउंडेशन चे अध्यक्ष प्रा. सुभाष आकरे, महामंत्री व रिपोर्टर फोरम आमगाव चे यशवंत मानकर, छबुताई उके जि. प. सदस्य, एड. सीमा शेंडे, कविता रहांगडाले,समाजसेवी रवि क्षिरसागर, बाजार समितीचे संचालक युवराज बिसेन, राजीव फुंडे, अजय खेतान, संतोष दुबे प्रामुखाने उपस्थित होते.
आयोजित आमगाव सांस्कृतिक कला महोत्सव निमित्य महिला संवाद कार्यक्रमात महिलांकरिता बचत गट, रोजगार,शासनाच्या योजना व लाभ तर आर्थिक पाठबळ ,बांधकाम मजूर, कमगार योजना याबाबत विविध मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी महिला उद्दमी यांचे सत्कार करण्यात आले.
आयोजित कार्यक्रमात महिलां करिता राजे छत्रपती शिवाजी महाराज जीवन दर्शन, लावणी, लोकगीत, माझी वसुंधरा यावर महिला कला अविष्कार सादरीकरण करून महिलानी आपल्या कला गुणांचे अविष्कार प्रदर्शित केले.
यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटक खासदार एन. डी. किरसान यांनी कला सांस्कृतिक महोत्सव यनिमित्त मार्गदर्शन करताना महिलांकरिता त्यांचे सशक्तिकरण ध्येय ठेवून आयोजित करण्यात आले असल्याचे नमूद करून त्यांनी या महोत्सव मधून बोध घेऊन जावे, महिलांना आर्थिक समाजिक क्रांती घडवायची असेल तर समूहाने या उद्योग व्यवसायाकडे वळावे लागणार आहे. महिला सशक्तिकारनातून आर्थिक समाजिक समरसता हा दृष्ठिकोन सार्थक ठरणार आहे. अश्या कार्यक्रमाचे आयोजन महिलांचे ध्येय पूर्ण करण्यासाठी सार्थक ठरणार आहे. असे मत वेक्त केले.कार्यक्रमाचे अद्यक्ष खा. भारती पारधी यांनी महिलांची खरी प्रगती साधायची असेल तर त्यांनी प्रगत उद्दमी बनने गरजेचे आहे. या मातृभूमीत अनेक महिलांचे कर्तृत्व आदर्श ठरले आहे. जर या मातीत पून्हा शिवाजी महाराज बघायचे असेल तर प्रत्येक मातेने माँ जिजाऊ बनने आवश्यक आहे. जगाला खरे मार्ग दाखविण्याची ताकद ही मातृशक्तीत आहे. तिला तिची ओळख निर्माण करावी लागेल. लाडक्या बहिणींनी अधीर होऊ नये त्यांनी आधार निर्माण करावे. महाराष्ट्राच्या उन्नती करिता महिलांचा शिहाचा वाटा आहे.श्रम व संस्कारातून प्रगती सादण्याची ताकद निर्माण करावी, केंद्र सरकारणे व राज्य सरकारांनी महिला सशक्तिकारनातून योजनाचा आधार दिला आहे, यात निक्षित प्रगती कारक पावले पुढे होत आहेत ही समाधाची बाब असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.कार्यकर्माचे प्रास्तावीक इंजि. प्रा.सुभाष आकरे यांनी केले. यावेळी त्यांनी केंद्र व राज्यशासनाचे जनकल्यान योजना व लाभ याबद्दल माहिती दिली.
कार्यक्रमाचे विस्तृत माहिती देताना यशवंत मानकर यांनी उद्योग व्यवसाय, कामगार कल्याण, युवक रोजगार माद्यमातून महिला सशक्तिकरण करीत असल्याचे माहिती देत त्यांनी महिला बचत गट, महिला उद्योग समूह यांच्या विविध उद्योगाची माहिती देत त्यांचे आदर्श घेऊन महिलांनी यात पुढाकार घेण्याचे सांगितले. कार्यक्रमात जिल्हा परिषद चे उपाद्यक्ष सुरेश हर्षे यांनी महिलांना उद्योगात उंच भरारी मिळावी याकरिता शासनाने दिलेले योजना, व्यापार संकुल यांची माहिती दिली.
आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमात महिलानी आपल्या कला गुणांचे सादरीकरण केले.यात समृद्धी डान्स अकॅडमी रीसामा समूहाने प्रथम तर द्वितीय मुनस्वी चापेकर या समूहाने मिळविले, यावेळी विजेताप्राप्त यांना खासदार एन. डी. किरसानप्रा. सुभाष आकरे, यशवंत मानकर,युवराज बिसेन रवि क्षिरसागर, राजीव फुंडे, वर्षा शर्मा, वैशाली तिराले यांनी रोख पुरष्कार देऊन त्यांचे गौरव केले.
तर केंद्रीय लोकसेवा आयोग परीक्षेत सचिन गुणवंत बिसेन यांनी यश संपादन केल्याबद्दल त्यांचे सत्कार करण्यात आले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बबिता अग्रवाल यांनी केले.कार्यक्रमात नवीन जैन, बाळाराम व्यास,खुमेश कटरे,हुकूम बोहरे,देवेंद्र मच्छीरके, शालिक फुंडे, हेमंत चावके,राजेश मानकर, नुपूर मानकर, रुपम शर्मा हिना चव्हाण बबीता अग्रवाल मंगला शिंगाडे किरण शर्मा, शोभा शर्मा, अर्चना चिंचाळकर यांनी सहकार्य केले.