देवरी येथे तथागत बुध्द व डॉ. बाबासाहेब आंबेडकर मूर्तीचे अनावरण येत्या सोमवारी

0
44

■ या निमित्य विविध कार्यक्रमाचे आयोजन.

देवरी,दि.०८: बुध्द पोर्णिमेच्या पर्वावर देवरी येथील ऊरूवेलावन बुध्द विहारात थाईलॅंड येथून बनवून आणलेल्या अष्ठधातूंच्या तथागत बुध्दांच्या मुर्ती व विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे पंचधातू मूर्तीचे अनावरण कार्यक्रमाचे आयोजन देवरी येथील वार्ड क्रं १३ येथे उरूवेला बुध्द विहार समिती च्या वतीने येत्या सोमवारी(दि.१२ मे ) रोजी सकाळी ९ वाजेपासून आयोजित करण्यात आले आहे. या निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन सुद्धा करण्यात आले आहे.
या कार्यक्रमात सकाळी ९ वाजता धम्म ध्वजारोहण, सामूहिक बुध्द वंदना,सकाळी १०.३० वाजे पासून लहान मुलांकरीता प्रश्न मंजुषा, दुपारी ४ वाजता तथागत बुध्द व डॉ. आंबेडकर यांच्या मुर्तीसह शांती कँडल रैली, सायंकाळी ६.३० वाजता दोन्ही मुर्तीचे विधीवत अनावण व परित्राणपाठ भन्ते भदंत संघधातु स्थवीर व मुलगंधकुटी बुध्द विहार देवरीचे पुज्य भन्ते परमपदा यांच्या हस्ते होणार आहे.
या प्रसंगी आयोजीत कार्यक्रमात सायंकाळी ७.३० वाजता कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त प्राचार्य के.सी. शहारे आणि प्रमुख आमंत्रीत देवरीचे नगराध्यक्ष संजू उईके, जि. प.सदस्य उषाताई शहारे, कल्पना वालोदे, कौशल्यायन महिला महाविद्यालयाचे संस्थापक चरणदास उंदिरवाडे आणि सामाजिक कार्यकर्ता नितेश वालोदे आदीची प्रामुख्याने उपस्थीती राहणार आहे. त्याचप्रमाणे रात्री ८.३० वाजता स्मृतीशेष रविकांता शहारे यांचे स्मृती प्रित्यर्थ खामखुर्रा येथील शंकर शहारे यांचे कडुन भोजन दान व रात्री ९ वाजता लोकांच्या मनोरंजना करीता भिमगितावर आधारीत भिमगित आर्केस्ट्रा चे आयोजन ही करण्यात आले आहे.
तरी या कार्यक्रमात देवरी व परीसरातील बौध्द समाज व इतर समाज बांधवानी जास्तीत जास्त संख्येत सहभाग घेवून या कार्यक्रमाला यशस्वी करावे असे आवाहन उरूवेला बुध्द विहार समितीचे अध्यक्ष जयपाल शहारे,उपाध्यक्ष शालीकराम शहारे,सचिव राजकुमार साखरे, सहसचिव चेतन कोचे,कोषाध्यक्ष मनोहर तागडे यांच्यासह समितीचे सर्व पदाधिकारी व सदस्य यांनी केले आहे.