विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करणे हेच आमचे ध्येय-प्रकल्प अधिकारी निरज मोरे

0
5

*खापा आश्रम शाळेत समर कॅम्प संपन्न*
तुमसर-एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प भंडारा अंतर्गत शासकीय माध्यमिक आश्रम शाळा खापा (खुर्द) तालुका तुमसर जिल्हा भंडारा येथे इयत्ता चौथी ते नववी च्या विद्यार्थ्यांसाठी समर कॅम्प चे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी समारोपीय कार्यक्रमाप्रसंगी बोलताना प्रकल्प अधिकारी निरज मोरे यांनी सांगितले की विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करणे हेच आमचे ध्येय असून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगती सोबतच शारीरिक मानसिक व सुप्त गुणांना वाव देणे हेच आमचे ध्येय आहे,
शासकीय आश्रमशाळा खापा येथे समर कॅम्प दिनांक 24 /4 /2025 ते 13 5/2025 या कालावधीत निवासी स्वरूपाचे विशेष शिकवणी वर्ग आणि त्यासोबतच विद्यार्थ्यांना चालना देण्यासाठी उन्हाळी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते
आदिवासी विकास विभाग नागपूर च्या अप्पर आयुक्त आयुषी सिंह व प्रकल्प अधिकारी नीरज मोरे यांच्या संकल्पनेतून व मार्गदर्शनाखाली सदर विशेष शिकवणी वर्गाचे व उन्हाळी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सदर शिबिरात एकूण 85 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. सकाळी सहा ते सातच्या दरम्यान शारीरिक व्यायाम, ज्ञानसाधना, योगा ,सकाळी नऊ ते 11 दरम्यान शिकवणी वर्ग ,दुपारी एक ते तीन च्या दरम्यान व्यक्तिमत्त्व विकास, चित्रकला, गोंडी पेंटिंग, वारली पेंटिंग ,इत्यादी. टाकाऊ पासून टिकाऊ पदार्थ तयार करणे, मातीकाम ,दुपारी चार ते सहा बॉक्सिंग, कराटे, खेळ व मनोरंजन अभिनय इत्यादी. तसेच सायंकाळी आठ ते नऊच्या दरम्यान संगीत कराओके गायन ,संस्कृती कार्यक्रम इत्यादी विषयक विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात आले
उन्हाळी शिबिरात आम्हाला खूप मजा आली घरची आठवण आली नाही आम्ही घरी असतो तर आम्हाला काहीच शिकायला मिळाले नसते असे मनोगत कुमारी नव्या सर्याम आणि इनवाते यांनी व्यक्त केले, उत्कृष्ट कलाकृती करिता विद्यार्थ्यांमधून प्रथम तीन क्रमांकात दिव्या धूर्वे, कृतिका धूर्वे,अक्षरा धूर्वे आणि विद्या कुंभरे व शरद कंगाली यांना प्रोत्साहन बक्षीस देऊन अभिनंदन करण्यात आले, समारोपीय कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रकल्प अधिकारी नीरज मोरे होते तर शाळेचे मुख्याध्यापक सुनील संतोषवार ,उपसरपंच रामचंद्र करमरकर, पालक तथा शाळा व्यवस्थापन समिती चेअध्यक्ष शामलता सलामे ,उपाध्यक्ष निलू मरसकोल्हे यांची प्रमुख उपस्थिती होती, सदर समारोपदरम्यान विद्यार्थ्यांनी तयार केलेले कलाकृती प्रदर्शनी बघून मान्यवरांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. आपल्या पाल्यांनी तयार केलेल्या कलाकृती व साहित्य पालकांनी प्रत्यक्ष बघितले व आपल्या पाल्याचे कौतुक केले.
कार्यक्रमाचे संचालन विद्यार्थिनी कुमारी सलोनी मरकाम व निशा गजाम यांनी केले तर मुख्याध्यापक सुनील संतोषवार यांनी प्रास्ताविक मांडले तर कृतिका धुर्वे यांनी मान्यवरांचे आभार मानले प्रशिक्षक म्हणून नितेश राऊत, पुणेसर बावणे, मयूर नागमोते ,श्रीधर सावंतवान ,रेखा सूर्यवंशी ,मनोज उईके यांनी विद्यार्थ्यांना विविध प्रकारचे प्रशिक्षण दिले सदर शिबिर आयोजनाबाबत प्रकल्प अधिकारी निरज मोरे यांना विद्यार्थ्यांचे व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले सदर समारोप कार्यक्रमांमध्ये सर्व विद्यार्थ्यांना बॅग देऊन सन्मानित करण्यात आले.