
वेगळ्या विदर्भाच्या आंदोलनात नागरिकांचा सहभाग वाढविणार
गोंदिया,दि.२१ : केंद्र सरकारने राज्य घटनेतील अनुच्छेद तीन नुसार विदर्भ राज्य त्वरीत निर्माण करावे अशी मागणी मागील १२० वर्षापासूनची केली जात आहे. दरम्यान कायमची असलेल्या मागणीचा निकाल लाण्यात यावा, या उद्देश्याने गोंदिया, भंडारा जिल्ह्यातील ग्रामीण भागातील नागरिकांनी या आंदोलनात सहभाग वाढविण्यासाठी विदर्भ राज्य आंदोलन समितीचे ७ जून रोजी भंडारा येथील वंजारी सभागृहात मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. त्या अनुषंगाने जिल्ह्यात विदर्भराज्य आंदोलन समितीची सभा पार पडली.
पूर्व विदर्भातील भंडारा, गोंदिया जिल्हयासह सर्व ६४ तालुक्यात, देशात सर्वाधिक कर्जात बुडाले आहे. विदर्भात २३ प्रकारच खनिजे आहेत. महाराष्ट्रातील ७० टक्के वीज विदर्भात निर्माण होते. बारमाही वाहणाऱ्या नद्या असून ५४ टक्के जंगल असूनही विदर्भावर अन्यायच केला जात आहे. केंद्र सरकारने राज्य घटनेतील अनुच्छेद तीन नुसार विदर्भाचे वेगळे राज्य त्वरीत निर्माण करावे आणि
विदर्भ राज्याच १२० वर्षापासूनची असलेली मागणी कायमसाठी निकालात काढावी. हा संदेश भंडारा व गोंदिया जिल्हयातील गावागावात पोहोचवून, जनजागरण करून, विदर्भ आंदोलनात समाजातील सर्व घटकांचा सक्रीय सहभाग वाढवून, त्यासाठी पूर्व विदर्भातील जनतेची मानसिकता तयार करण्यासाठी विदर्भ राज्य आंदोलन समितीचा पूर्व विदर्भाचा ‘वेगळे विदर्भ मेळावा’ ७ जून आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यात पूर्व विदर्भातील जनतेने मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन विदर्भराज्य आंदोलन समितीने केले आहे.
बैठकीला एड. वामनराव चटप (अध्यक्ष, वि.रा.आं.स.), प्रभाकर कोडबत्तुनवार (को.क सदस्य), अतुल सतदेवे (जिला समन्वयक गोंदिया), संजय केवट ( गोंदिया भंडारा विभाग प्रमुख), दादाराव फुंडे (जिलाध्यक्ष, गोंदिया), विजय नवखरे (जिलाध्यक्ष, भंडारा), संतोष पांडे (वरिष्ठ विदर्भवादी), छैलबिहारी अग्रवाल (को.क. सदस्य) वसंतराव गवळी (गोंदिया शहर समन्वयक), अरुण बन्नाटे (गोंदिया जिलाध्यक्ष युवा आघाडी), पंचशिला पानतवने (जिलाध्यक्ष म.आ.), दिपा काशिवार (को.क. सदस्य), सुंदरलाल लिल्हारे (को.क. सदस्य), अजय गौर (को. क. सदस्य), व्ही.बी. चौधरी (को.क. सदस्य), भोजराज ठाकरे (उपाध्यक्ष गोंदिया जिला), सी.पी.बिसेन ( जिला महासचिव), यशवंत रामटेके, एस पी बोरकर, बाबुराव जनबंधु, अशोक बनसोड, लालाजी कुचेकर, नागेश गौतम, वजीर बिसेन, प्रदीप उजवने, कमलेश उके आदि विदर्भवादी कार्यकर्ता पदाधिकारी उपस्थित होते.