तालुका बौद्ध समाज संघातर्फे तहसीलदारांमार्फत राष्ट्रपतींना निवेदन

0
17

महाबोधी विहार बौद्धांच्या स्वाधिन करा
सडक अर्जुनी :बुद्धगया टेम्पल अॅक्ट १९४९ रद्द करून महाबोधी महाविहार बौद्धांच्या स्वाधीन करा, तथा भंते विनाचार्य यांच्या बेकायदेशीर अटकेचा विरोध करीत त्यांची तुरूंगातून सुटका करा, या मागणीसाठी २१ मे रोजी तालुका बौद्ध समाज संघ सडक अर्जुनी तसेच बौद्ध बांधवांच्या वतीने संबोधी बुद्ध विहार येथून आंदोलनाला सुरुवात करण्यात आली व तहसीलदार मार्फत भारताचे राष्ट्रपती यांना निवेदन पाठविण्यात आले.

निवेदनात, बुध्द गया टेम्पल हे बौध्दांचे जागतिक वारसा स्थळ आहे. त्यामुळे बौध्द गया टेम्पल अॅक्ट १९४९ रद्द करून महाविहार हे बौध्दांच्या स्वाधीन करावे, तसेच भंते विनाचार्य यांच्यावरील खोटे गुन्हे मागे घेण्यात यावे, त्यांची तरूंगातून विनाशर्त मुक्तता करावी, बुध्द गया येथील महाबोधी विहारात बुध्द धम्माच्या विरुध्द व विसंगत आचरण बंद करावे, असे कृत्य करणाऱ्या व्यक्तींवर तत्काळ गुन्हे दाखल करण्यात यावे, बुध्द गया व आजूबाजूच्या परिसरातील बौध्द स्थळांना भेट देणाऱ्या पर्यटकांच्या सुरक्षेसाठी विशेष उपाययोजना कराव्यात, बौध्द लोकांना तथा पर्यटकांना मारहाण करणाऱ्या लोकांवर तात्काळ गुन्हे दाखल करावे, तथा त्यांना बुद्ध विहार परिसरात जाण्यास मज्जाव करण्यात यावे, अशा मागण्यांचा समावेश करण्यात आला असून मागण्यांचे निवेदन तहसीलदार मार्फत भारताचे राष्ट्रपती यांना पाठविण्यात आले आहे. निवेदन देतेवेळी भन्ते संघधातू व तालुका बौद्ध समाज संघाचे अध्यक्ष सचिव व इतर पदाधिकारी तसेच बुद्ध विहारांचे सदस्य व तालुक्यातील बौद्ध बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.