खमारी बुटी परिसरात धुमाकूळ घालणारा ‘तो’ बिबट जेरबंद

0
31

भंडारा- तालुक्यातील खमारी बुटी परिसरात मागील काही दिवसांपासून बिबट्याचे वास्तव्य होते. काही दिवसांपासून या परिसरात बिबट्याचा धुमाकूळ कायम असतांना दि.१९ मे रोजी रात्रीदरम्यान शिकारीच्या शोधात गावात आलेल्या बिबट्याने गोठ्यात बांधलेल्या ९ शेळ्यांवर हल्ला चढवून शिकार केली. या घटनेमुळे शेतकरी पशुपालकात रोष उफाळून येऊन (Leopard jailed News) बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी करण्यात आली. अखेर वनविभागाने बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरा ठेवण्यात आला. त्या पिंजर्‍यात रात्री ११.४० वाजतादरम्यान बिबट शिकार खान्यासाठी आला व पिंजर्‍यामध्ये अडकला. यामुळे सध्या तरी ग्रामस्थ नागरिकांनी बिबट्याच्या दहशतीपासून मुक्तता मिळाली.

कोका वन्यजीव अभयारण्यालगत असलेल्या परिसरात वाघ, बिबट, अस्वल व अन्य वन्यप्राण्यांचा मोठ्या प्रमाणात धुमाकूळ असून मानवावर हल्ले केले जात आहे. या सोबतच पाळीव जनावरांचा फळसा पाडून शेतपिकाचे मोठे नुकसान करीत आहेत. मे महिन्याच्या सुरुवातीला (Leopard jailed News) बिबट्याने खमारी बुटी येथे धुमाकूळ घालून समरीत नामक पशुपालकाची शेळी फस्त केली. तर दि.१८ मे रोजी पहाटे दरम्यान ईश्वर गोपीचंद समरीत यांच्या वैनगंगा नदी किनार्‍यावरील शेतातील गोठ्यात बांधलेल्या ९ शेळ्यांची शिकार केली.

घटना उघडकीस आल्यानंतर सहाय्यक वनसंरक्षक रितेश भोंगाडे, वनपरिक्षेत्र अधिकारी विलास बेलकोडे व अन्य वनकर्मचार्‍यांनी घटनास्थळ गाठून पाहणी केली. त्यावेळी ग्रामस्थ नागरिकांच्या आक्रोशाला वन अधिकार्‍यांना सामोरे जावे लागले. गावात तणावाची परिस्थिती निर्माण झाल्याने पोलिसांना पाचारण करण्यात आले. ग्रामस्थांनी (Leopard jailed News) बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी लाऊन धरली. अखेर ग्रामस्थांच्या मागणीनुसार सदर बिबट्याला जेरबंद करण्याचे ठरविण्यात आले. त्यानुसार भंडारा वनविभागाचे जलद बचाव दल यांनी घटनास्थळी दाखल होऊन घटनास्थळाजवळ पिंजरा लावला. तसेच वनकर्मचार्‍यांच्या रात्रगस्तीत वाढ केली.

दि.१९ मे रोजी रात्री ११.४० वाजता दरम्यान बिबट शिकार खान्यासाठी आला व पिंजर्‍यात अडकला. याची माहिती वनविभागाला मिळताच त्यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. वरिष्ठ वनाधिकार्‍यांनी (Leopard jailed News) बिबट याची पाहणी करुन त्याला घटनास्थळापासून दूर निसर्ग अधिवासात मुक्त केले. सदर कारवाई उपवनसंरक्षक राहुल गवई, यांचे मार्गदर्शनात सहाय्यक वनसंरक्षक रितेश भोंगाडे, वनपरिक्षेत्र अधिकारी विलास बेलकोडे, तसेच क्षेत्र सहाय्यक कोका, आर.एम.तिगुडे, क्षेत्र सहाय्यक ए.डी.वासनिक, बिटरक्षक मांडवी ए.एम.उपाध्ये, बिटरक्षक दवडीपार एस.एस.उकडे, बिटरक्षक पहेला के.एन.मस्के, बिटरक्षक मालीपार व्हि.डी.डोंगरे, बिटरक्षक रावनवाडी विजय राऊत, बिटरक्षक डोडमाझरी कसदेवाड, ए.एम.शेडके तसेच बचाव दलाचे शशांक तुरस्कर, अविनाश नागपुरे, वाढीवे, राहू वंजारी, राहू वानखेडे, आदिंनी केली आहे.