
गोंदिया,दि.२३: गोंदिया-भंडारा लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. प्रशांत पडोळे यांनी गुरुवारी गोंदिया नगर परिषदेमध्ये अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतल्यानंतर टू व्हीलरने गोंदिया शहराच्या विविध भागांत जाऊन पाहणी केली.या दौऱ्यात त्यांनी शहरातील रस्त्यांची स्थिती, स्वच्छता व्यवस्था, नालींची व्यवस्था व नागरी सुविधा यांचा थेट आणि प्रत्यक्षपणे आढावा घेतला. टू व्हीलरवरून पाहणी करून त्यांनी ट्रॅफिक, गल्ली-बोळांची अवस्था आणि नागरिकांच्या अडचणी समजून घेतल्या.
गांधी चौक, गोरेलाल चौक, दुर्गा चौक, अंडरग्राउंड, रामनगर, रेलटोली, राजाभोज कॉलनी आणि मुख्य बाजार परिसर यासारख्या महत्त्वाच्या भागांना भेट देत खासदारांनी अस्वच्छता, अकार्यक्षम नाली व्यवस्था आणि खराब रस्त्यांवर चिंता व्यक्त केली. त्यांनी नगर परिषद अधिकाऱ्यांना त्वरित उपाययोजना करण्याचे स्पष्ट निर्देश दिले.
पाहणी दरम्यान खासदार डॉ. पडोळे यांनी नागरिकांशी संवाद साधत त्यांच्या तक्रारी ऐकून घेतल्या. स्थानिक नागरिकांनी नगर परिषद संबंधित अनेक समस्यांकडे लक्ष वेधले. यावर खासदारांनी सर्व तक्रारींवर शीघ्र कारवाई होईल, असा विश्वास दिला.
या दौऱ्यात माजी आमदार व जिल्हाध्यक्ष दिलीपजी बंसोड, शहर काँग्रेस अध्यक्ष ॲड. योगेश अग्रवाल बापू, युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष राजकुमार बाबा बागडे, NSUI जिल्हाध्यक्ष अमन तिगाला, विशाल अग्रवाल,बाजार समितीचे उपसभापती राजकुमार पप्पू पटले, नागरत्न बंसोड, सुनील भालेराव, बलजीत बग्गा, जहिर अहमद, राहुल बावनथडे, अंकुश गजबिए, प्रतीक लांजेवार, रवी ऊके, रुपाली ऊके, अरमान जायसवाल, राजेंद्र दुबे, शैलेश जायसवाल, अमान रोघाटिया, देवचंद बिसेन, कशिश चंद्रिकपुरे यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.