तिरोडा तालुका कर्मचारी पतसंस्थेची निवडणूक निर्विरोध,अध्यक्षपदी रहागंडाले

0
53

तिरोडा,दि.२५ः- तिरोडा तालुका कर्मचारी पतसंस्थेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत सर्व संचालक मंडळाची निर्विरोध निवड करण्यात आली.सहाय्यक निबंधक डी.आर.नवघरे यांच्या अध्यक्षतेखाली बबीताताई गिरेपुंजे यांच्या उपस्थितीत तिरोडा तालुका कर्मचारी पतसंस्था पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली.यामध्ये अध्यक्ष कन्हैयालाल साधुजी रहांगडाले,उपाध्यक्ष राजेश गोंडूजी पटले,कोषाध्यक्ष कु.निलू गुलाबराव लारोकर यांची निवड करण्यात आली.
नवनिर्वाचित संचालक सर्वस्वी राजू विठोबा गुनेवार,देवेंद्र लक्ष्मण गजभिये,संजय अनंतराम रहांगडाले,धर्मराज दुर्गाजी रिनायत,पालकर ईश्वर भारती,दिनदयाल फुलचंद पटले,शीलाताई धर्मराज पारधी,पुष्पाताई हरगोविंद पटले,तज्ज्ञ संचालक राजकुमार चामट,जवाहरलाल बोपचे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
नवनियुक्त पदधिकाऱ्याचे पं. स सभापती तेजराम चव्हाण,प्रगती पतसंस्थेचे उपाध्यक्ष दिपक पटले,नुतन बांगरे,वडेगावचे सरपंच श्यामराव बिसेन,राजेश गुणेरिया,जितेंद्र डहाटे,डी.टी.कावळे,श्री साकुरे,शितल कनपटे,संजय बोपचे सर्व कर्मचारी वृंद व मित्र मंडळींनी अभिनंदन केले