
नागपूर : महाराष्ट्र टाईम्स चे संपादक श्रीपाद अपराजित यांच्या मातोश्री श्रीमती कल्पनाताई विनायकराव अपराजित यांचे आज सोमवार, दि.२६ मे रोजी दुपारी वृध्दापकाळाने निधन झाले. त्या ८३ वर्षांच्या होत्या. त्यांच्या मागे मुलगा, सून, नातवंड आणि बराच मोठा आप्तपरिवार आहे.
त्यांच्यावर आज सोमवारी संध्याकाळी ७ वाजता सहकारनगर घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. तत्पूर्वी त्यांची अंत्ययात्रा त्यांचे निवासस्थान लिव्हीयानो १२ अपार्टमेंट, पाचवा मजला, काटोले ज्वेलर्सच्या बाजूला, विजयानंद सोसायटी, चक्करवार चौक, नरेंद्रनगर नागपूर येथून निघाली.यावेळी नातेवाईकासंह मित्रमंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.