स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि.लबडे यांची चंद्रपूरला बदली

0
59

गोंदिया,दि.२७ः गोंदिया पोलिस विभागात स्थानिक गुन्हे शाखेचे कार्यभार सांभाळल्यानंतर अवैध धंदे व्यवसाय करणार्यांसोबतच गुन्ह्यात फरार असलेल्या आरोपींचा शोध घेत जेरबंद करुन स्थानिक गुन्हे शाखेला नावलौकिक मिळविणारे पोलिस निरिक्षक दिनेश लबडे यांची प्रशासकीय बदली चंद्रपूर येथे झाली आहे.लबडे यांच्या कार्यकाळात गुन्हेगारीत सहभागी असलेल्या अनेकांना मकोका,एमपीडीए अंतर्गत कारवाई करुन जिल्ह्याबाहेर करण्यात श्री.लबडे यांच्या नेतृत्वातील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने चांगली कामगिरी केली होती.