आदर्श सार्वजनिक वाचनालय येथे शिवराज्याभिषेक दिन साजरा

0
22

गोरेगाव -६ जुन-तालुक्यातील मोहाडी येतील अ दर्जा प्राप्त ग्रंथालय आदर्श सार्वजनिक वाचनालय येथे आज दिनांक ६ जुनला हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेक दिन साजरा करण्यात आला.यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे अध्यक्ष मदनलाल बघेले, प्रमुख पाहुणे ग्राम पंचायत  सरपंच नरेंद्र कुमार चौरागडे, सेवानिवृत्त मुख्याध्यापक जे जे पटले, पोलिस पाटील राजेश येळे, तंन्टामुक्त गांव समिती अध्यक्ष लिखीराम बघेले सदस्य हिरालाल महाजन, प्रमानंद तिरेले,डि आर चौरागडे, चंद्रकुमार चौरागडे, शिवराम मोहनकार,चैतराम डोहळे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी सरपंच नरेंद्र कुमार चौरागडे यांनी सांगितले की आजच्या दिवशी म्हणजे ६ जुन १६७४ ला किल्ले रायगडवर छत्रपती शिवरायाचा राज्यभिषेक पार पडला. हा सोहळा तब्बल 9 दिवस चालला. शिवरायाचा राज्यभिषेक सोहळा म्हणजे भारताच्या इतिहासातील एक सुवर्ण पान आहे. शिवरायांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली असे स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आहेत असे प्रतिपादन केले. यावेळी गावातील नागरिक व ग्रंथालयाचे वाचक विध्यार्थी मोठ्या प्रमाणात उपस्थित होतेकार्यक्रमाचे प्रास्ताविक व संचालन संस्थेचे सचिव सुभाष चौरागडे यांनी केले तर आभार आशा चेचाने केले.