
वाशिम,दि.६ जुन-छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेक दिनानिमित्त आज दि.६ जुन रोजी वाशिम शहरातील अकोला नाका व छत्रपती श्री शिवाजी महाराज चौक येथील अश्वारूढ पुतळ्याला राज्याचे क्रीडा व युवक कल्याण, अल्पसंख्यांक विकास तसेच औकाफ मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
या प्रसंगी विधानपरिषद सदस्य आमदार किरणराव सरनाईक, जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस, पोलीस अधीक्षक अनुज तारे, निवासी उपजिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे,उपविभागीय अधिकारी वैशाली देवकर, तहसीलदार निलेश पळसकर,नगर परिषदचे मुख्याधिकारी निलेश गायकवाड, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे तसेच अनेक लोकप्रतिनिधी, अधिकारी व शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.यादरम्यान पालकमंत्री श्री. भरणे व उपस्थित मान्यवरांनी अकोला नाका येथील अश्वारूढ पुतळ्याच्या परिसरात वृक्षारोपण केले.सोहळ्याची सुरुवात घोषणांच्या, निनादात झाली.महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून उपस्थितांनी अभिवादन केले.