शिवराज्याभिषेक दिनानिमित्त गोरेगाव येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत कार्यक्रमाचे आयोजन

0
16

गोरेगाव, दि.6:  येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत आज शिवराज्याभिषेक दिनानिमित्त उत्साहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून बबलू पटले व श्रीकांत चौधरी शिवराज्याभिषेक दिनानिमित्त गोरेगाव येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून बबलू पटले व श्रीकांत चौधरी (उद्योजकता व सामाजिक कार्यकर्ते) उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे प्राचार्य व्ही. बी. मात्रे होते.

कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस माल्यार्पण व दीपप्रज्वलनाने झाली. यानंतर प्रमुख पाहुण्यांचे स्वागत प्राचार्य व्ही. बी. मात्रे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पाहुण्यांनी प्रशिक्षणार्थ्यांना उद्बोधक मार्गदर्शन केले. त्यांनी राष्ट्रभक्ती, सामाजिक बांधिलकी आणि स्वावलंबन यावर भर देत शिवाजी महाराजांचे आदर्श जीवन युवा पिढीने आत्मसात करावे, असे सांगितले.

त्यानंतर प्रशिक्षणार्थी डोमेश्वर येरणे, मोनिका सोनवाने, मयुरी बावनथडे, मंदार राऊत यांनी कुटुंब प्रबोधन, स्वदेशी विचार, पर्यावरण संरक्षण व सामाजिक समरसता या विषयांवर प्रभावी भाषणे दिली.या कार्यक्रमात सेवानिवृत्त प्राचार्य व्ही. टी. पटले यांनी शासनाच्या “पंच परीवर्तन” या संकल्पनेवर आधारित नागरी कर्तव्य व शिष्टाचार या विषयांवर मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिल्पनिदेशक ललित पुंजे यांनी केले तर आभार शिल्पनिदेशक आर. एस. पोटे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनात योगेश बरडे, शुभम रंगारी, रामकृष्ण मेहेर, तेजस नेवारे, पी. एस. ताकसांडे, जितेंद्र बिसेन, आकाश छडिमलक व इतर कर्मचारी व प्रशिक्षणार्थ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले.हा कार्यक्रम उत्स्फूर्त प्रतिसादात व मोठ्या उत्साहात पार पडला.