
चित्रा कापसे/तिरोडा,दि.०७-तालुक्यातील बयवाडा येथील कवी लेखक, तथा सामाजिक कार्यकर्ता श्री किशोर मलेवार यांना महाराष्ट्र प्रतिभा सन्मान पुरस्कार २०२५ स्वराज्य प्रतिष्ठान मुंबई, धडक कामगार युनियन महासंघ, हुतात्मा बाबू गेनू स्पारक समिती मुंबई च्यावतीने शिवराज्य भिषेक दिनानिमित्त दिनांक ८ जून २०२५ ला मुंबई प्रदान करण्यात येणार आहे. मुंबई येथे पुरस्कार प्रदान पद्मश्री डॉ तात्याराव लहाने माजी अधिष्ठाष्ठा जे.जे. रुग्णालय मुंबई, डॉ शीतल मालुसुरे,अभिजित दादा राणे,संभाजीराजे जाधवराव,प्रमोद आप्पा पाटील,सुरज भोईर व मान्यवर यांच्या उपस्थित होणार आहे.
किशोर मलेवार यांना महाराष्ट्र प्रतिभा सन्मान पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल रोहिदास बावनकर ग्रा.प सदस्य, सेवकभाऊ मरघडे त.मू अध्यक्ष, सौ कल्पना मलेवार पोलिस पाटील, शेखर नंदागवली,विजय मलेवार,विलास मलेवार,राजुभाऊ चामट ,आनंद मलेवार,राजूभाऊ उके,सुनील बावनकर,प्रणय बावनकर संपूर्ण गावकऱ्यानी व मित्रमंडळीने अभिनंदन केले आहे .
आतापर्यंत किशोर मलेवार यांना व्यसनमुक्तीवर कविता व पुस्तक लेखनाबद्दल राज्यस्तरावरील चार पुरस्कार मिळाले आहे. तर मुंबई मिळणारे तिसरे पुरस्कार आहे. याआधी मुंबई येथे समाज अनुभूती पुरस्कार, साने गुरुजी राष्ट्रप्रेरणा पुरस्कार मिळाला आहे.