मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत गडचिरोली जिल्ह्यात १९ सामाजिक दायित्व उपक्रमांसाठी सामंजस्य करार; सर्वांगीण विकासाला नवी दिशा

0
17
गडचिरोली, दि. ७:दुर्गम, आदिवासी व नक्षलग्रस्त भाग असलेल्या गडचिरोली जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी जिल्हा प्रशासनाने खासगी क्षेत्रातील सामाजिक उत्तरदायित्व (CSR) निधीच्या माध्यमातून ऐतिहासिक पाऊल उचलले आहे. मुख्यमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस व सहपालकमंत्री आशिष जयस्वाल यांच्या प्रमुख उपस्थितीत एकूण १९ सामाजिक उपक्रमांबाबत सामंजस्य करार (MoU) करण्यात आले.
अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर, अतिरिक्त प्रधान मुख्य वनसंरक्षक नरेश झुरमुरे, जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा, विशेष पोलीस उपमहानिरीक्षक अंकीत गोयल, खासदार नामदेव किरसान, आमदार धर्मरावबाबा आत्राम, आमदार डॉ मिलिंद नरोटे, आमदार रामदास मसराम, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे, जिल्हा पोलीस अधीक्षक श्री निलोत्पल यावेळी उपस्थित होते होते.
या करारांद्वारे शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, महिला सक्षमीकरण, सौरऊर्जा, जलसंधारण, पोषण, कृषी, ग्रामविकास आणि पायाभूत सुविधा या क्षेत्रांमध्ये कार्यवाही होणार असून, हे उपक्रम स्थानिक जनतेसाठी थेट लाभदायक ठरणार आहेत. शासन व खासगी क्षेत्र यांच्यातील समन्वयातून गडचिरोलीमध्ये सामाजिक परिवर्तन घडवण्याच्या दृष्टीने हा एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे.
*प्रमुख सामाजिक दायित्व उपक्रम व करार
भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (BPCL): भाताच्या काड्यांपासून संकुचित बायोगॅस व इथेनॉल प्रकल्प उभारणी.
हुंडई मोटर्स: २०० शाळांमध्ये स्वच्छ पिण्याच्या पाण्याची सुविधा.
क्लीनमॅक्स व फार्मर्स फॉर फॉरेस्ट्स: ३०,००० पैकी १५,६०० स्वच्छ चुलींचे वाटप.
एचडीएफसी लाइफ: गोंडेवाही येथे २०० एकरवर बांबू लागवड; ५०० ते १००० एकरचे उद्दिष्ट.
एस्सिलॉर फाउंडेशन: ‘सपनों का पिटारा’ उपक्रमांतर्गत शाळांमध्ये लायब्ररी व चष्मे वाटप.
सेल्को इंडिया: १५ प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये सौरऊर्जा प्रणाली; आणखी ३९ केंद्रे नियोजित.
हिंदुस्तान युनिलिव्हर: मामा तलाव येथे जलसंधारण प्रकल्प.
नाबार्ड व बाईफ: ५० गोदामांचे बांधकाम.
ॅक्सिस बँक व बाईफ: ५,००० आदिवासी कुटुंबांचे उत्पन्न दुपटीने वाढवणे.
एसबीआय व बाईफ: १८,००० कुटुंबांचे जीवनमान उंचावणे.
वेदांता लिमिटेड: १०० अंगणवाड्यांचे नुतनीकरण (९ जून २०२५ पासून प्रारंभ).
जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प: ५ नवीन अंगणवाड्यांची उभारणी.
टाटा ट्रस्ट: स्थानिक शेतकऱ्यांमार्फत अन्न व पोषण उपक्रम.
टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस: युवकांसाठी रोजगारक्षम प्रशिक्षण.
प्राज इंडस्ट्रीज: महुआ फुलांपासून जैवइंधन निर्मिती.
झोमॅटो: ५०० हेक्टर कृषिवनशैली (अॅग्रोफॉरेस्ट्री) प्रकल्प.
पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन: आदिवासी वसतिगृह बांधणी.
एचडीएफसी बँक व डब्ल्यूओटीआर: ‘परिवर्तन’ उपक्रमांतर्गत ग्रामविकास.
राष्ट्रीय विमा संस्था व बाईफ: महिला सक्षमीकरण आणि पोषण कार्यक्रम.
*सामंजस्य करारावेळी उपस्थित संबंधित संस्थेचे प्रतिनिधी*
शौरभ शर्मा – सीएसआर व्यवस्थापक, हुंडई
दीपक पांडे – मुख्य कार्यकारी अधिकारी, सुविधा
अश्वनी परमार – वरिष्ठ व्यवस्थापक, फार्मर्स फॉर फॉरेस्ट्स
संदीप साहा – उपमहाव्यवस्थापक, क्लीनमॅक्स
संतोष निवेंडेकर – राज्य समन्वयक, बीपीसीएल
पी. अनिलकुमार – कार्यकारी संचालक, बायोफ्युएल्स
आर. सासी प्रकाश – महाव्यवस्थापक, बायोफ्युएल्स
संजय ठाकूर – उपमहाव्यवस्थापक, बायोफ्युएल्स
अभिजित चव्हाण – राज्य प्रमुख, बीपीसीएल
गणपत काबाडी, प्रकाश केसकर, आरती खडसे – डब्ल्यूओटीआर
भारत काकडे, रविराज जाधव, शैलेश भगत – बाईफ
अमोघ ममदापुर – सेल्को इंडिया
परशुराम कुलकर्णी – झोमॅटो
संदीश पाटील – नेचर इन्स्टिट्यूट
धृबनारायण मुखर्जी, नंद घर, शशी अरोरा – वेदांता लिमिटेड
अशुतोष शेओपुरे – जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प
अद्वैत मजुमदार – ग्रुप हेड, कपिल भात्रा स्टेट हेड,ॲक्सिस बँक
मोहनिष शेलवटकर – तहसीलदार, गडचिरोली