जिल्हाधिकारी कार्यालयात नागरी सुविधा यंत्राचे लोकार्पण

0
9

गोंदिया,दि.18- येथील जिल्हाधिकरी कार्यलयात नागरी सुविधा यंत्र लावण्यात आले असून पालकमंत्री राजकुमार बडोले यांच्या हस्ते या नागरी यंत्राचे लोकार्पण करण्यात आले आहे. आज पासून हे नागरी यंत्र सर्वसामान्य लोकांकरिता जिल्हाधिकारी कार्यालयात उघडे राहणार आहे. गोंदिया जिल्यात असलेल्या सर्व शासकीय कार्यलयाचे पत्ते, शासकीय योजना ,जिल्ह्यातील पर्यटन स्थळ ,तलावे ,जलाशय ,संबंधित विभागांचे अधिकारी शेती योजना ,मतदार यादी, अधिकाऱ्यांचे आणि कार्यलयाचे फोन नंबर आदी योजनांचा लाभ या नागरी सुविधा यंत्राच्या माध्यमातून लोकांना घेता येणार असून प्रायोगिक तत्वावर म्हणून जिल्हाधिकारी कार्यलयात हि पहिली मशीन लावण्यात आली अाहे.या नंतर तालुकास्थरावरील उपविभागीय अधिकारी कार्यलयात आणि त्या नंतर तहसील कार्यालय परिसरात देखील हि मशीन लावण्यात येणार असलायची माहिती जिल्हाधिकरी डॉ विजय सूर्यवंशी यांनी दिली आहे